news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चौकात ६ डिसेंबरला प्रवास टाळा! वाहतूक शाखेची पर्यायी मार्गाची अधिसूचना जारी; ग्रेडसेप्रेटरचा वापर करण्याचे आवाहन

पिंपरी चौकात ६ डिसेंबरला प्रवास टाळा! वाहतूक शाखेची पर्यायी मार्गाची अधिसूचना जारी; ग्रेडसेप्रेटरचा वापर करण्याचे आवाहन

इंदिरा गांधी पूल, महावीर चौक आणि नाशिक फाट्याकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी; पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांचे आदेश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील वाहतुकीत बदल!

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अभिवादन स्थळी होणाऱ्या गर्दीमुळे महावीर चौक, नाशिक फाटा व नेहरू नगरकडून येणारी वाहतूक दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत वळवण्यात येणार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी अनुयायी आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने या भागातील वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.

पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, विवेक पाटील यांनी दिनांक ०३/१२/२०२५ रोजी याबाबतची अधिसूचना (Notification) निर्गमित केली आहे.

हे बदल दुपारी १२.०० ते रात्री २२.०० वाजेपर्यंत लागू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांना खालील मार्गांनी प्रवेश बंदी असेल:

प्रवेश बंदी असलेला मार्ग पर्यायी मार्ग
महावीर चौक चिंचवड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे सर्व्हिस रोडने येणारी वाहने. डी. मार्ट ग्रेडसेप्रेटर (Grade Separator) मार्गे इच्छितस्थळी जातील.
नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे सर्व्हिस रोडने येणारी वाहने. डेअरी फार्म ग्रेडसेप्रेटर इनएच.पी. पंप खराळवाडी ग्रेडसेप्रेटर इन मार्गे इच्छितस्थळी जातील.
स्वर्गिय इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणारी वाहने. मोरवाडी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
नेहरूनगर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणारी वाहने. एच.ए. कॉर्नर बसस्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे इच्छितस्थळी जातील.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सर्व वाहनचालकांना नमूद केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी वाहतूक विभागाने अधिसूचनेच्या अनुषंगाने योग्य बॅरिकेडिंग करून वाहनचालकांना मार्गदर्शन करणारे फलक लावण्याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!