news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड कचरा जागेवर आता कला! जुने टायर, पोस्टर आणि लाकडी फळ्यांना दिले कलात्मक रूप; भोसरी प्रभाग क्रमांक ०७ मध्ये सौंदर्यीकरणाचा नवा आदर्श

कचरा जागेवर आता कला! जुने टायर, पोस्टर आणि लाकडी फळ्यांना दिले कलात्मक रूप; भोसरी प्रभाग क्रमांक ०७ मध्ये सौंदर्यीकरणाचा नवा आदर्श

'इ' क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे आणि पथकाची प्रभावी अंमलबजावणी; जुन्या विटा, बांबूच्या साहाय्याने साकारले 'आकर्षण केंद्र'. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘वेस्ट टू आर्ट’चा यशस्वी प्रयोग! टाकाऊ वस्तूंनी बदलला भोसरीतील ‘विकास कॉलनी’चा चेहरामोहरा

 

 

भारत गॅस एजन्सीजवळील कचरा संवेदनशील जागेचे आकर्षक कला केंद्रात रूपांतर; महापालिकेचा अभिनव उपक्रम

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कचरा संवेदनशील (Garbage Sensitive) ठिकाणांचे रूपांतर करण्यासाठी हाती घेतलेल्या ‘वेस्ट टू आर्ट’ (Waste to Art) या अभिनव कलात्मक पुनर्वापर उपक्रमामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. भोसरी प्रभाग क्रमांक ०७ अंतर्गत भारत गॅस एजन्सी नजीक, विकास कॉलनीतील जागेचे नुकतेच सौंदर्यीकरण करण्यात आले असून, टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली ही कलाकृती स्थानिक नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहा. आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात हा ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

‘इ’ क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ०७ अंतर्गत इ क्षेत्रीय कार्यालयाने या उपक्रमाची अंमलबजावणी केली. यात खालील टाकाऊ वस्तूंना नवीन कलात्मक रूप देण्यात आले:

  • जुने टायर

  • फाटलेली पोस्टर्स

  • जुन्या लाकडी फळ्या आणि बांबू

  • जुन्या विटा

रंगीबेरंगी रांगोळी, स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आणि या टाकाऊ वस्तूंनी केलेल्या आकर्षक मांडणीमुळे एकेकाळच्या या कचरा संवेदनशील जागेचा संपूर्ण कायापालट झाला आहे.

हा टाकाऊ कचऱ्यापासून कलात्मकता निर्माण करण्याचा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

हा ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहा. आरोग्य अधिकारी राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गौरव गायकवाड तसेच अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!