news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड प्रभाग १० मध्ये भाजपचा ‘महाविजया’चा संकल्प! तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे आणि कुशाग्र कदम मैदानात

प्रभाग १० मध्ये भाजपचा ‘महाविजया’चा संकल्प! तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे आणि कुशाग्र कदम मैदानात

हनुमान मंदिरापासून निघालेल्या पदयात्रेने संभाजीनगर भगवेमय; हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाची 'चौकडी' सज्ज. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निर्धार विजयाचा, शिलेदार विकासाचा! प्रभाग १० मध्ये भाजपच्या उमेदवारांचे भव्य शक्तीप्रदर्शन

 

 

मोरवाडी-शाहूनगर पट्ट्यातून तुफान जनसमुदायासह उमेदवारी अर्ज दाखल; विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दिनांक २५ डिसेंबर २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज .

पिंपरी-चिंचवड (दि. २७ डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातील मोरवाडी, शाहूनगर आणि संभाजीनगर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.


उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विद्यानगर येथील हनुमान मंदिरापासून भव्य पदयात्रेला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ही पदयात्रा बर्ड व्हॅली चौक, एच डी एफ सी कॉर्नर, बुद्ध विहार (शाहूनगर), रसरंग स्वीट्स चौक, सिद्धिविनायक मंदिर (संभाजीनगर), तुळजाभवानी मंदिर मार्गे रामेश्वर-दत्त मंदिर (संभाजीनगर) येथे संपन्न झाली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण प्रभाग दणाणून सोडला होता.

प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने चारही उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले:

  • ड (सर्वसाधारण प्रवर्ग): तुषार हिंगे

  • अ (अनुसूचित जाती महिला): श्रीमती अनुराधा गणपत गोरखे

  • ब (ओबीसी महिला): सौ. सुप्रियाताई महेश चांदगुडे

  • क (सर्वसाधारण): कुशाग्र मंगला अशोक कदम

अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार अमित गोरखे, मार्गदर्शक उमेशभाऊ चांदगुडे, भाजप शहर प्रवक्ते कुणाल लांडगे, सौ. सोनाली हिंगे, तेजस हिंगे आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना उमेदवारांनी सांगितले की, “गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये मूलभूत सोयी-सुविधा आणि विकासाची मोठी कामे केली आहेत. जनतेचा मिळणारा हा उदंड प्रतिसाद पाहता, आमचा विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मोरवाडी-शाहूनगरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जनता आम्हाला नक्कीच पुन्हा संधी देईल.”


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!