news
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्लारस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देशपरदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधीपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणकासांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
Home पिंपरी चिंचवड कृतज्ञता सोहळा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २७ शिलेदारांना सन्मानपूर्वक निरोप; प्रदीर्घ सेवेचा गौरव

कृतज्ञता सोहळा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २७ शिलेदारांना सन्मानपूर्वक निरोप; प्रदीर्घ सेवेचा गौरव

मधुकर पवळे सभागृहात रंगला निरोप समारंभ; सेवानिवृत्तांनी समाजासाठी वेळ देण्याचे उपआयुक्तांचे आवाहन, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिकेच्या प्रगतीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे; २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निरोप

 

 

प्रामाणिक सेवेचा गौरव; निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उपआयुक्त संदीप खोत यांच्या शुभेच्छा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी (दि. २ जानेवारी २०२६): “सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने बजावलेली सेवा ही महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत मोलाची ठरली आहे,” असे प्रतिपादन उपआयुक्त संदीप खोत यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.


मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात हा गौरव सोहळा पार पडला. यामध्ये डिसेंबर २०२५ अखेर वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे २२ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अशा एकूण २७ कर्मचाऱ्यांचा उपआयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उपआयुक्तांनी यावेळी शुभेच्छा देताना म्हटले की, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी जावे, तसेच यापुढील प्रवासात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.

नियत वयोमानानुसार निवृत्त:

प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, मुख्याध्यापिका शामला शिंदे, लेखापाल चंद्रकला फुलसुंगे, सिस्टर इन्चार्ज अनिता लोंढे, जयश्री फाळके, प्रयोगशाळा सहाय्यक सुधाकर रासकर, कनिष्ठ अभियंता सतिश तायडे, वीजतंत्री भास्कर नेटके, वाहनचालक शंकर शिंगाडे, मनोज माछरे, मजूर ज्ञानेश्वर काळभोर, राजू भुजबळ, शहाजी बोत्रे, विलास माने, रखवालदार बाबुराव कायंदे, मुकादम जयश्री गडदे, स्प्रे कुली अरूण राक्षे, सफाई कामगार मुक्ताबाई लष्करे, रमा बाराथे, सफाई सेवक गीता तांबोळी, राजू बारसे आणि गटरकुली राजेश खरात.

स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी:

मजूर दिनकर देवाचे, सफाई कामगार पांडुरंग काकडे, संजय भोंडवे, सोपान लोहकरे आणि गोदावरी मोरे.

या सोहळ्यास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बबन झिंजुर्डे, मुख्य लिपिक उमेश बांदल, माया वाकडे यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!