news
Home पिंपरी चिंचवड आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर आता ‘तिसरी नजर’! निवडणूक प्रशासनाकडून तक्रारींसाठी हेल्पलाईन जारी

आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर आता ‘तिसरी नजर’! निवडणूक प्रशासनाकडून तक्रारींसाठी हेल्पलाईन जारी

प्रलोभने, अनधिकृत फ्लेक्स किंवा पैशांचे वाटप दिसताच ९२७१०६६... क्रमांकांवर करा कॉल; नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने होणार ॲक्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार आता एका फोनवर; प्रशासनाकडून प्रभागनिहाय संपर्क क्रमांक जाहीर

 

 

तक्रारींसाठी आठ निवडणूक कार्यालयांचे कक्ष कार्यान्वित; उपआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी (दि. २ जानेवारी २०२६): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता कडकपणे लागू करण्यात आली आहे. या कालावधीत आचारसंहितेचा भंग झाल्यास नागरिकांना थेट तक्रार करता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय आचारसंहिता कक्षांचे संपर्क क्रमांक आणि पत्ता जाहीर केला आहे.


संपूर्ण शहरासाठी मुख्य आचारसंहिता कक्ष महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, पिंपरी येथे कार्यरत आहे.

तुमच्या प्रभागातील आचारसंहिता उल्लंघनाची माहिती देण्यासाठी खालीलपैकी संबंधित केंद्राशी संपर्क साधावा:

कार्यालय क्र. समाविष्ट प्रभाग पत्ता/ठिकाण संपर्क क्रमांक
१०, १४, १५, १९ हेडगेवार भवन, निगडी ९२७१०६६०८२
१६, १७, १८, २२ ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड ९२७१०६६०८५
२, ६, ८, ९ ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी ९२७१०६६०८८
२५, २६, २८, २९ बीआरटी रोड, राहटणी ९२७१०६६०९१
३, ४, ५, ७ लांडगे नाट्यगृह परिसर, भोसरी ९२७१०६६०९४
१, ११, १२, १३ चिखली टाऊन हॉल परिसर ९२७१०६६०९७
२१, २३, २४, २७ ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव ९२७१०६६१००
२०, ३०, ३१, ३२ कासारवाडी भाजी मंडई हॉल ९२७१०६६१०३

आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात पैशांचे वाटप, प्रलोभने, अनधिकृत बॅनरबाजी किंवा इतर कोणत्याही आचारसंहिता भंग करणाऱ्या बाबी आढळल्यास नागरिकांनी वरील क्रमांकांवर त्वरित माहिती द्यावी. नागरिकांची माहिती गोपनीय ठेवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!