news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड निगडी बस स्थानकावर ज्येष्ठ महिलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! पोलिसांनी अवघ्या एका तासात आवळल्या मुसक्या

निगडी बस स्थानकावर ज्येष्ठ महिलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! पोलिसांनी अवघ्या एका तासात आवळल्या मुसक्या

महाराष्ट्रासह कर्नाटकात धुमाकूळ घालणारी टोळी जेरबंद; दिघीतील घरफोडी आणि सांगवीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड, पोलीस आयुक्तांकडून पथकाचे कौतुक. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! बसस्टॉपवर दागिने चोरणारी आंतरराज्य टोळी १ तासात जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २४ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बस थांब्यांवर ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट १ ने अवघ्या एका तासात पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३ महिला आरोपींसह घरफोडी करणाऱ्यांना आणि दुचाकी चोरांनाही अटक करण्यात आली असून, एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील पीएमपीएमएल बस थांब्यांवर गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने कटरच्या सहाय्याने कापून चोरण्याचे प्रकार वाढले होते. १९ जानेवारी २०२६ रोजी निगडी बस स्थानक परिसरात तीन महिला एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने कापून पळून जात असल्याची माहिती पोलीस शिपाई सोहल चिखलकर यांना मिळाली. महिला पोलीस हवालदार उषा दळे यांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि गाठण जप्त करण्यात आले आहे.

टोळीचा गुन्हेगारी इतिहास:

तपासात असे निष्पन्न झाले की, ही एक आंतरराज्य टोळी असून त्यांच्यावर कर्नाटक राज्यातील अफजलपूर, गुलबर्गा, विजापूर तसेच महाराष्ट्रातील वांद्रे, परभणी, दादर आणि कुर्ला येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेने याच मोहिमेत आणखी दोन महत्त्वाच्या कारवाया केल्या:

१. दिघी घरफोडी: दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या करणाऱ्या एका आरोपीला आणि चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १.५० लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

२. सांगवी दुचाकी चोरी: पोलीस उपनिरीक्षक स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५० लाख रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, उषा दळे, विजय शेळके, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उद्धव खेडकर, दीपक तांदळे आणि केशव चेपटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!