news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे भरधाव पीएमपी बसचा पुन्हा एकदा बळी! ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच अंत; पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भरधाव पीएमपी बसचा पुन्हा एकदा बळी! ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच अंत; पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बस थांब्यावर उतरल्यानंतर रस्ता ओलांडताना काळाचा घाला; चतु:शृंगी पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुणे: औंध रोडवर रस्ता ओलांडताना पीएमपी बसची धडक; ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू, मैत्रिण जखमी


पुणे, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे : औंध रोडवरील केंद्रीय विद्यालयासमोर रस्ता ओलांडताना पीएमपी बसने दिलेल्या धडकेत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकला ज्ञानोबा वाव्हळ (वय ७५, रा. इंदिरा वसाहत, औंध रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांची मैत्रिण प्रभावती भोसले (वय ७४) या जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला वाव्हळ आणि प्रभावती भोसले या दोघी मैत्रिणी शुक्रवारी (३० जानेवारी) कामानिमित्त शिवाजीनगरला गेल्या होत्या. रात्री सव्वानऊच्या सुमारास त्या पीएमपी बसने परत औंध रोडवर आल्या. बस थांब्यावर उतरल्यानंतर रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका भरधाव पीएमपी बसने त्यांना जोरात धडक दिली.

या अपघातानंतर चंद्रकला वाव्हळ यांचा मृत्यू झाला, तर प्रभावती भोसले यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रभावती भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुणे शहरात पीएमपी बसच्या अपघातांचे सत्र वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!