news
पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांकडून चिखली आणि निगडी प्रकल्पांचे ‘ऑन ग्राऊंड’ इन्स्पेक्शन‘कल्चर क्रेस्ट’मध्ये आता प्रशासक राज! उपनिबंधकांकडून विद्यमान समिती बरखास्त; सभासदांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाची मोठी कारवाईहक्काचे पाणी हिरावले! एकट्या विधवा महिलेला पाहून देशमुखांची बोअरवेलवर जबरदस्ती; “जे करायचे ते कर” म्हणत दिली जीवे मारण्याची धमकीविचारांच्या लढाईत शस्त्राचे काय काम? दिव्या शिंदे यांच्या ‘त्या’ विधानामुळे कायदेशीर संकट ओढवणार; तरुणाईने सावध राहण्याची गरज“गुन्हेगारी सोडली नाही, तर शहर सोडावे लागेल!”; सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
Home नाशिक ठिया महिला राज! मालेगावच्या दोन्ही सर्वोच्च पदांवर महिलांची वर्णी; ‘काळ्या बुर्ख्यावर हिरवे फेटे’ बांधून कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक जल्लोष

ठिया महिला राज! मालेगावच्या दोन्ही सर्वोच्च पदांवर महिलांची वर्णी; ‘काळ्या बुर्ख्यावर हिरवे फेटे’ बांधून कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक जल्लोष

माजी आमदार असिफ शेख यांच्या नेतृत्वाचा करिश्मा; एमआयएमची तटस्थ भूमिका इस्लाम पक्षाच्या पथ्यावर, ८४ सदस्यांच्या सभागृहात नवे समीकरण. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मालेगाव महानगरपालिकेवर ‘इस्लाम’ पक्षाचा झेंडा! महापौरपदी नसरीन बानो तर उपमहापौरपदी शानेहिंद निहाल अहमद विराजमान


मालेगाव/नाशिक, ७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मालेगाव/नाशिक : मालेगाव महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अखेर ‘इस्लाम’ (ISLAM – Indian Secular Largest Assembly of Maharashtra) पक्षाने बाजी मारली आहे. आज, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत नसरीन बानो मोहम्मद खालिद अहमद यांची महापौरपदी, तर शानेहिंद निहाल अहमद (समाजवादी पार्टी) यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे. या विजयामुळे मालेगावात ‘सेक्युलर फ्रंट’ची सत्ता स्थापन झाली असून, एमआयएम (AIMIM) आणि शिवसेनेचा सत्तेचा दावा फोल ठरला आहे.

८४ सदस्य संख्या असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत बहुमतासाठी ४३ जागांची आवश्यकता होती. निवडणुकीत ३५ जागा जिंकणाऱ्या इस्लाम पक्षाने ५ जागा असलेल्या समाजवादी पार्टीशी युती करून ४० चा आकडा गाठला होता. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३ जागांसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने इस्लाम पक्षाचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे, २१ नगरसेवक असलेल्या एमआयएम पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा (तटस्थ राहण्याचा) निर्णय घेतल्याने इस्लाम पक्षाचा विजय अधिक सुकर झाला.

यावेळचे मालेगावचे महापौरपद ‘सर्वसाधारण प्रवर्ग महिला’साठी आरक्षित होते. नवनियुक्त महापौर नसरीन बानो यांनी इस्लाम पक्षाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, उपमहापौरपदी निवड झालेल्या शानेहिंद निहाल अहमद या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून, मालेगाव महानगरपालिकेच्या इतिहासात दोन्ही प्रमुख पदे महिलांकडे जाण्याची ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.

निवडणूक निकाल जाहीर होताच मालेगाव शहरात इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. “काळ्या बुर्ख्यावर हिरवे फेटे” परिधान करून नवनियुक्त नगरसेवकांनी महापालिकेत दिमाखात प्रवेश केला, ज्याची चर्चा संपूर्ण राज्यभर होत आहे. माजी आमदार असिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील या नवनव्या इस्लाम पक्षाने स्थापनेनंतर अवघ्या काही काळातच महापालिकेची सत्ता हस्तगत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पक्ष जागा
इस्लाम पार्टी (ISLAM) ३५
एमआयएम (AIMIM) २१
शिवसेना (SHS) १८
समाजवादी पार्टी (SP) ०५
काँग्रेस (INC) ०३
भाजप (BJP) ०२

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!