पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांतून अंत्योदयाचा संकल्प! पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा; मान्यवरांनी वाहिली आदरांजली
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान आणि अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी ‘समर्पण दिन’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी येथील शहर भाजप कार्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना उपमहापौरांनी पंडितजींच्या त्यागमय जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांनी मांडलेल्या महान विचारांवर प्रकाश टाकला.
भाजपचे शहर उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खडतर जीवनप्रवास आणि भारतीय जनसंघापासून भाजपच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. समाजातील शेवटच्या रांगेतील घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजप सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशालीताई खाडे, नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सीए आघाडी अध्यक्ष बबनराव डांगले, सतपाल गोयल, जगदीश शेट्टी, गणेश वाळुंजकर, सुधीर निर्बीकर, प्रसाद दिवाळीलीकर, प्रकाश सोळंकी, किशोर पवार, अशोक शुभेदार, प्रकाश बंब, रमेश पुजारी, रविंद्र सानप, सुभाष सिंगल, गोविंद सिंदे, अभिजित रॉय, शरद पेद्दी आणि संजय परळीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी केले. या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षनिष्ठेची आणि सामाजिक कार्याची नवी ऊर्जा संचारल्याचे पाहायला मिळाले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
