news
ताथवडेच्या पायाभूत सुविधांसाठी मंत्रालयात खलबते! पशुसंवर्धन विभागाच्या जागेसाठी आमदार शंकर जगतापांची पंकजा मुंडेंसोबत चर्चापुष्पगुच्छांऐवजी ज्ञानाची भेट! उपमहापौर शर्मिला बाबर यांचा सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श; ६० विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पुढाकार“फ्लाइट रडारचा डेटा एक मिनिट आधीच बंद का झाला?”; रोहित पवारांचा तांत्रिक ‘सर्जिकल स्ट्राईक’; घातपाताची शक्यता व्यक्त“एकाच जागेवर किती वर्षे?”; महापौर रवी लांडगे यांचा प्रशासकीय ‘सफाई’ मोहिमेचा पवित्रा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले लेखी आदेशरांगेत उभे राहण्याचे टेन्शन मिटले! महापालिकेची झोपडपट्टी सेवाकर प्रणाली झाली हाय-टेक; बचत गटांमार्फत घरपोच बिलांचे वाटप
Home पिंपरी चिंचवड ताथवडेच्या पायाभूत सुविधांसाठी मंत्रालयात खलबते! पशुसंवर्धन विभागाच्या जागेसाठी आमदार शंकर जगतापांची पंकजा मुंडेंसोबत चर्चा

ताथवडेच्या पायाभूत सुविधांसाठी मंत्रालयात खलबते! पशुसंवर्धन विभागाच्या जागेसाठी आमदार शंकर जगतापांची पंकजा मुंडेंसोबत चर्चा

अग्निशमन केंद्र, रुग्णालय आणि एसटीपी प्रकल्पांना मिळणार गती; पंकजा मुंडे यांचे प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश, पश्चिम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ताथवडेच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार! पशुसंवर्धन विभागाची जागा महापालिकेला देण्याबाबत शंकर जगतापांचा मंत्रालयात पाठपुरावा; पंकजा मुंडे यांचा सकारात्मक प्रतिसाद

 


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ११ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई/पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि ताथवडे परिसरातील नागरी सुविधांना गती देण्यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत त्यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात (DP) ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची जागा अत्यंत कळीची मानली जात आहे. या जागेच्या हस्तांतरणामुळे खालील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत:

  • ४५ मीटर स्पाईन रोड: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा दुवा.

  • पवना नदीवरील पूल: सांगवी-किवळे परिसराला जोडणारा प्रस्तावित पूल.

  • नागरी सुविधा: अग्निशमन केंद्र, रुग्णालय, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (STP) आणि पाणी पुरवठ्यासाठीची टाकी (ESR).

आमदार शंकर जगताप यांनी यापूर्वी झालेल्या बैठका, अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी आणि विभागाची प्राथमिक सहमती यावर पंकजाताई मुंडे यांचे लक्ष वेधले. शहराचा विकास करताना पशुसंवर्धन विभागाच्या कार्यात कोणताही अडथळा येणार नाही आणि विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जगताप यांनी दिली. यावर पंकजा मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत, कायदेशीर व प्रशासकीय चौकटीत राहून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

“पिंपरी-चिंचवड हे वेगाने वाढणारे शहर आहे. शहराच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन ही जागा महापालिकेला मिळणे आवश्यक आहे. नागरिकांच्या हिताचे हे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले. यावेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे उपस्थित होते.

या जागेच्या हस्तांतरणामुळे ताथवडे, पुनावळे आणि रावेत परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!