news
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्लारस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देशपरदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधीपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणकासांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
Home अकोला दुर्दैवी! डिझेलच्या बॅरल्समुळे घरात लागलेल्या आगीत चिमुरडीसह तिघांचा अंत; अकोल्यातील अडगाव बुद्रुक हादरले

दुर्दैवी! डिझेलच्या बॅरल्समुळे घरात लागलेल्या आगीत चिमुरडीसह तिघांचा अंत; अकोल्यातील अडगाव बुद्रुक हादरले

शॉर्ट सर्किट की बेकायदा इंधन साठा? पोलीस तपासात निष्पन्न होणार आगीचे मूळ कारण; आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर गावकऱ्यांनी डागली टीकेची तोफ. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोल्यात भीषण आग! ६ वर्षांच्या चिमुरडीसह तिघांचा होरपळून मृत्यू; बेकायदा डिझेल साठ्यामुळे आग भडकल्याचा गावकऱ्यांचा आरोप

 


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, १३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला/अकोट : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे गुरुवारी सायंकाळी एका घराला लागलेल्या भीषण आगीत ६ वर्षांच्या बालिकेसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठवडी बाजार परिसरातील एका घरात लागलेली ही आग इतकी भयानक होती की, घरात अडकलेल्यांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला डिझेलचा साठा असल्यानेच आगीने रौद्ररूप धारण केले, असा गंभीर आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.

या आगीच्या तांडवात मृत्यू झालेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:

१. स्वरा प्रभुदास सोळंके (वय ६ वर्षे)

२. अनिल उकरडा चव्हाण (वय २७ वर्षे)

३. रत्ना उकरडा चव्हाण (वय ५५ वर्षे)

(स्वरा आणि अनिल यांचा जागीच मृत्यू झाला, तर रत्ना चव्हाण यांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.)

मिळालेल्या माहितीनुसार, हे घर शेख इब्राहिम यांच्या मालकीचे असून तेथे हे सर्व भाड्याने राहत होते. गावकऱ्यांच्या मते, घरामध्ये निष्काळजीपणे आणि विनापरवाना डिझेलचे मोठे बॅरल्स साठवून ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आग लागली आणि या इंधनामुळे काही मिनिटांतच संपूर्ण घर आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. दरम्यान, पोलिसांनी ‘शॉर्ट सर्किट’ हे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले असले तरी, गावकऱ्यांनी मात्र डिझेल साठ्याकडेच बोट दाखवले आहे.

या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. जखमींना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते, मात्र तिथे एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. अखेर गावकऱ्यांनी त्यांना खासगी वाहनाने अकोट ग्रामीण रुग्णालयात नेले. या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील आणि शिवरखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले असून, बेकायदा डिझेल साठ्याबाबतच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!