news
पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी हायटेक पाऊल! निगडीत १० मजली इमारतीचे काम युद्धपातळीवर; उपमहापौरांकडून कामाच्या दर्जाची झाडाझडतीअंगावर शहारे आणणारा ‘शिवराज्याभिषेक’ सोहळा! ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद“कुळवाडी भूषण शिवरायांचा जीवन-संघर्ष घराघरांत पोहोचवणार!” किवळे येथे प्रा. विक्रम कदम यांचे विशेष व्याख्यान“शिक्षणाची ज्योत तेवती ठेवणारा हा पुरस्काराचा सोहळा!” चिंचवडमध्ये मान्यवरांची मांदियाळी; ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६४ वसतिगृहे सुरू केल्याची मंत्री अतुल सावे यांची माहिती“केवळ जमातीचा उल्लेख करा, धर्माचा नको!” मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे कडक निर्देश; आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची सुधारणा
Home पिंपरी चिंचवड “शिक्षणाची ज्योत तेवती ठेवणारा हा पुरस्काराचा सोहळा!” चिंचवडमध्ये मान्यवरांची मांदियाळी; ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६४ वसतिगृहे सुरू केल्याची मंत्री अतुल सावे यांची माहिती

“शिक्षणाची ज्योत तेवती ठेवणारा हा पुरस्काराचा सोहळा!” चिंचवडमध्ये मान्यवरांची मांदियाळी; ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६४ वसतिगृहे सुरू केल्याची मंत्री अतुल सावे यांची माहिती

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध क्षेत्रांतील महिलांना 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार' प्रदान; समाजात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भगिनींचा सन्मान. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नायगावचे नाव आता ‘सावित्री नगर’ होणार! ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि स्मारकांचे काम युद्धपातळीवर; चिंचवडमध्ये ‘क्रांतिज्योती’ पुरस्कारांचे दिमाखदार वितरण

 

 


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड : “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असलेल्या नायगावचे नाव लवकरच ‘सावित्री नगर’ म्हणून ओळखले जाईल. सावित्रीबाईंचे स्मारक, सावता बाबांचे भव्य स्मारक आणि भिडे वाड्याचे काम पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” अशी महत्त्वाची ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चिंचवड येथे दिली.

महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला.

मंत्री अतुल सावे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत ओबीसी मुला-मुलींसाठी ६४ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीच्या माध्यमातून यूपीएससीमध्ये ४२ आणि एमपीएससीमध्ये ५२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले, याचे मला मोठे समाधान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची ही संधी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत.”

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले:

  • फुले दांपत्य पुरस्कार: सूर्यकांत ज्ञानोबा भसे व मिराताई सूर्यकांत भसे.

  • आदर्श माता: देवई वाळुंजकर, हिराबाई भुजबळ, सुभद्रा अर्जुन म्हेत्रे.

  • समाज भूषण: शकुंतला जगताप, कविता आल्हाट, वृषाली मरळ, रंजना कुदळे.

  • वैद्यकीय भूषण: डॉ. शुभांगी म्हेत्रे (रखमाबाई राऊत वैद्यकीय भूषण), डॉ. दिपाली देशमुख.

  • शिक्षण व कला: शिल्पा रोडगे (कार्यक्षम शिक्षण अधिकारी), ज्योत्स्ना भुजबळ, सीमा शिंदे, सुनिता शिंदे, स्मिता बनकर (आदर्श शिक्षिका), डॉ. ऋतुजा जगताप, हर्षा औटी (कला भूषण).

  • इतर: मनिषा सुरेश गोरे (महिला भूषण), संगिता टिळेकर (कृषी रत्नभूषण), सायरा शिकलगार (फातिमा सावित्री पुरस्कार), सोनिया राजगिरे (उद्योग भूषण), मिना माळी (आदर्श सरपंच), श्रद्धा सावर्डेकर (अध्यात्म भूषण).

या सोहळ्याला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, वसंत लोंढे, अपर्णा डोके, संगीता ताम्हाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी केले, तर स्वागत अपर्णा डोके यांनी केले. सूत्रसंचालन महादेव भुजबळशोभा चव्हाण यांनी केले आणि आभार सूर्यकांत ताम्हाणे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत डोके, सूर्यकांत ताम्हाणे, अनिल साळुंके, महादेव भुजबळ, निलेश डोके, नितीन ताजणे यांसह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!