news
Home अमरावती ‘सेमीकंडक्टर हब’ बनण्याच्या भारताच्या मोहिमेत अमरावतीचे योगदान! शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न

‘सेमीकंडक्टर हब’ बनण्याच्या भारताच्या मोहिमेत अमरावतीचे योगदान! शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न

एफपीजिये आणि ॲसिक प्रणालींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली १२० विद्यार्थ्यांना मिळाले 'हँड्स-ऑन' प्रशिक्षण. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘चिप डिझाइन’चा जागर! १२० विद्यार्थ्यांनी घेतले व्हीएलएसआय तंत्रज्ञानाचे धडे; सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल


अमरावती, २० फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती : तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभाग व पुणे येथील ‘एजूस्फियर सिस्टिम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विशेष कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. ‘इलेक्ट्रॉनिक डिसाईन ऑटोमेशन टूल्सचा वापर करून सेमीकंडक्टर संकल्पना ते फ्रंट-एंड आणि बॅक-एंड इंडस्ट्री रेडी व्हिएलयसआय (VLSI) चिप डिझाइन’ या विषयावर आधारित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत सरकार देशाला सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, तृतीय व अंतिम वर्षाच्या सुमारे १२० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून चिप डिझाइन आणि प्रोग्रामिंगचा प्रत्यक्ष (Hands-on) अनुभव देण्यात आला.

कार्यशाळेतील मुख्य तांत्रिक पैलू:

  • अद्ययावत सॉफ्टवेअर्स: मायक्रोविंड, डिव्हाईस स्केमॅटिक, स्पाइस आणि व्हिवाल्डो यांसारख्या सॉफ्टवेअर्सचे प्रशिक्षण.

  • जटिल प्रणाली: एफपीजिये (FPGA) आणि ॲसिक (ASIC) यांसारख्या प्रणालींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक.

  • इंडस्ट्री रेडी स्किल्स: उद्योगांमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बारकावे आणि हार्डवेअर प्रोग्रामिंगचे सखोल ज्ञान.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. विभाग प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला, तर समन्वयक प्रा. विवेक राऊत यांनी याचे चोख नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. महल्ले यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

या प्रशिक्षणाुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ओळख झाली असून, सेमीकंडक्टर उद्योगातील वाढत्या संधींचा लाभ घेण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृदांच्या परिश्रमामुळे ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!