news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड “आईचे संस्कार अन् वडिलांचे धाडस म्हणजे शिवराय!” प्रा. प्रशांत मोरे यांनी उलगडले मातृत्वाचे पैलू; शिवविचार प्रबोधन पर्वाचा भावूक समारोप

“आईचे संस्कार अन् वडिलांचे धाडस म्हणजे शिवराय!” प्रा. प्रशांत मोरे यांनी उलगडले मातृत्वाचे पैलू; शिवविचार प्रबोधन पर्वाचा भावूक समारोप

"जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजे रुजली"; लोककवींच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने शिवप्रेमींचे डोळे पाणावले, आठवडाभराच्या प्रबोधन पर्वाची चिंचवडमध्ये सांगता. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संस्कारांची ज्योत आणि शिवरायांचे कर्तृत्व! लोककवी प्रशांत मोरे यांच्या कवितांनी ‘प्रबोधन पर्वा’चा भावनिक समारोप; संभाजीनगरमध्ये मातृत्वाची महती अधोरेखित

 


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २२ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजे रुजली आणि शिवबांसारखे अलौकिक नेतृत्व घडले. आईचे संस्कार आणि वडिलांचे धाडस यांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज,” अशा शब्दांत लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी मातृत्वाची ताकद आणि शिवरायांच्या जडणघडणीचा इतिहास उलगडला. त्यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा अत्यंत भावूक वातावरणात समारोप झाला.

शहरातील नागरिकांमध्ये शिवविचार पोहोचवण्यासाठी १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत महापालिकेच्या वतीने या प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील संभाजीनगर येथे पार पडलेल्या या सांगता समारंभाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रा. मोरे यांनी “हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय..” ही अजरामर कविता आपल्या सुमधुर आवाजात सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर जिजाऊंच्या संस्कारांपासून ते सामान्य घरातील आईच्या त्यागापर्यंतचे विविध पैलू त्यांनी कवितेतून मांडले.

  • “बाप बाभळीचा काटा ऊन पिऊन जगतो, माय पारंब्या पारंब्या पसारा भुईत..” * “बाप शिवाराचा धनी, माय शिवाराची राणी..” अशा ओळींमधून त्यांनी शेतकरी माय-बापाचे कष्ट आणि प्रेम यांचे जिवंत चित्रण केले.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रबोधन पर्व यशस्वी झाले. समारोप प्रसंगी नगरसेविका अनुराधा गोरखे, तुषार हिंगे, कुशाग्र कदम, माजी महापौर मंगला कदम आणि उपायुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे आणि सहखजिनदार मंगेश गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रबोधन पर्वाच्या या आठवडाभराच्या उपक्रमाने शहरात शिवविचारांचे नवे चैतन्य निर्माण केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!