news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांची माणुसकी! ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत १२१ बालकांना मिळवून दिले हक्काचे घर

पिंपरी-चिंचवड पोलिसांची माणुसकी! ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत १२१ बालकांना मिळवून दिले हक्काचे घर

अनेक कुटुंबांमधील हरवलेली 'मुस्कान' पुन्हा परतली; एका महिन्यात २७ मुले आणि ९४ मुलींचा शोध, आयुक्तालयाकडून 'ऑपरेशन मुस्कान-१४' यशस्वी. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हरवलेली १२१ मुले पुन्हा पालकांच्या कुशीत! पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये चमकदार कामगिरी; आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला यश


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ या विशेष शोध मोहिमेला मोठे यश आले आहे. गेल्या एक महिन्यात पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन विविध कारणांनी हरवलेल्या आणि पळवून नेलेल्या एकूण १२१ बालकांचा (२७ मुले आणि ९४ मुली) शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कामगिरीमुळे अनेक कुटुंबांमधील हरवलेली ‘मुस्कान’ (हास्य) पुन्हा परतली आहे.

अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली होती.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या मोहिमेत स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेला तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

  • जुन्या गुन्ह्यांचा शोध: २०१८ पासून २० जानेवारी २०२६ पर्यंतच्या कालावधीत हरवलेल्या २१४ बालकांपैकी (३० मुले व १८४ मुली) पोलिसांनी शोध घेऊन ७१ बालकांना पालकांच्या ताब्यात दिले.

  • ताज्या प्रकरणांत यश: मोहीम सुरू असताना (२० जानेवारी ते २० फेब्रुवारी) दाखल झालेल्या ७२ प्रकरणांपैकी ५० बालकांचा (१६ मुले व ३४ मुली) यशस्वीरीत्या शोध घेण्यात आला.

    अशा प्रकारे मोहिमेदरम्यान एकूण १२१ बालकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि विशेषतः अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), गुन्हे शाखा यांनी विशेष तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ही शोधकार्य पूर्ण केले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड आणि श्री. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपआयुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने केली आहे.

मुले हरवल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!