news
अकोला एलसीबीचा ‘सापळा’ यशस्वी; शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर आरोपीच्या आवळल्या मुसक्या; पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धडक कारवाईवाहतूक पोलिसांची की गुंडांची टोळी? नाशिक फाटा चौकातील ‘त्या’ प्रकाराने पोलीस प्रतिमा मलीन; वरिष्ठ नागरिकाला ‘अरे-तुरे’ करत दिली दंडाची धमकी“अनुदानाचे तुकडे नकोत, कायद्याचे संरक्षण द्या!”; राजूभाऊ वानखडे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा; ४ प्रमुख मागण्यांसाठी मूर्तीजापुरात एल्गारकराचा भरणा करा आणि जप्तीची कारवाई टाळा! महापालिकेचे थकबाकीदारांना सुवर्णसंधी; १८ विभागीय कार्यालयांची विशेष पथके सक्रिय‘कृषिरत्न’ ते ‘युवा शेतकरी’; विविध गटांतील पुरस्कारांसाठी नोंदणी सुरू; विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांचे आवाहन
Home पिंपरी चिंचवड त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाचा वनवास संपणार! ११ एप्रिलला होणार ऐतिहासिक भूमिपूजन; महापौरांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रबोधन पर्वा’ची बैठक संपन्न

त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाचा वनवास संपणार! ११ एप्रिलला होणार ऐतिहासिक भूमिपूजन; महापौरांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रबोधन पर्वा’ची बैठक संपन्न

महापुरुषांच्या विचारांतून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा संकल्प; सामाजिक संघटनांच्या बैठकीत नियोजनावर शिक्कामोर्तब, माता रमाई स्मारकाच्या घोषणेने कार्यकर्त्यांत उत्साह. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरीत ‘विचार प्रबोधन पर्वा’चा जागर; ११ एप्रिल रोजी माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन होणार – महापौर रवि लांडगे


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात मोठी उपयुक्तता आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. या प्रबोधन पर्वाच्या नियोजनासाठी महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात शहरातील विविध सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत महापौरांनी एक मोठी घोषणा करत, शहरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन येत्या ११ एप्रिल २०२६ रोजी होणार असल्याचे जाहीर केले.

विचार प्रबोधन पर्व केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता ती एक प्रभावी वैचारिक चळवळ बनावी, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये व्याख्याने, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने, नाट्यप्रयोग आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी महापुरुषांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या खंबीरपणे सोबत असल्याचे सांगितले.

बैठकीला उपस्थित असलेल्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या:

  • स्थानिक वक्ते आणि अभ्यासकांना संधी द्यावी.

  • महिला आणि युवकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा.

  • नियोजनासाठी संयुक्त समिती स्थापन करून आधुनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, धर्मपाल तंतरपाळे, सारिका मासुळकर, मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संतोष जोगदंड, बाळासाहेब रोकडे, अंजना गायकवाड, विशाल ओव्हळ, सिद्धार्थ बनसोडे, विजय जाधव, जितेंद्र मोटे आणि शहरातील अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजनाच्या घोषणेमुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सर्वांनी एकत्रितपणे प्रबोधन पर्व यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!