news
अकोला एलसीबीचा ‘सापळा’ यशस्वी; शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर आरोपीच्या आवळल्या मुसक्या; पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धडक कारवाईवाहतूक पोलिसांची की गुंडांची टोळी? नाशिक फाटा चौकातील ‘त्या’ प्रकाराने पोलीस प्रतिमा मलीन; वरिष्ठ नागरिकाला ‘अरे-तुरे’ करत दिली दंडाची धमकी“अनुदानाचे तुकडे नकोत, कायद्याचे संरक्षण द्या!”; राजूभाऊ वानखडे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा; ४ प्रमुख मागण्यांसाठी मूर्तीजापुरात एल्गारकराचा भरणा करा आणि जप्तीची कारवाई टाळा! महापालिकेचे थकबाकीदारांना सुवर्णसंधी; १८ विभागीय कार्यालयांची विशेष पथके सक्रिय‘कृषिरत्न’ ते ‘युवा शेतकरी’; विविध गटांतील पुरस्कारांसाठी नोंदणी सुरू; विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांचे आवाहन
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या चिमुकल्या कलाकारांची ‘काळा घोडा’ भरारी! १०० शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी आकुर्डीकर भारावले

पिंपरी-चिंचवडच्या चिमुकल्या कलाकारांची ‘काळा घोडा’ भरारी! १०० शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी आकुर्डीकर भारावले

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध; आकुर्डीत रंगला 'आर्ट बॉक्स' उपक्रमाचा कलाविष्कार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘केवळ डॉक्टर-इंजिनिअरच नव्हे, तर कलाकारही घडले पाहिजेत!’; उपमहापौर शर्मिला बाबर यांनी थोपटली विद्यार्थ्यांची पाठ; महापालिका शाळांच्या ‘आर्ट बॉक्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

आकुर्डी : “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न न पाहता कला, क्रीडा आणि इतर सर्जनशील क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करावी. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी मुंबईतील प्रसिद्ध ‘काळा घोडा कला महोत्सवात’ साकारलेल्या चित्रकला, प्रतिकृती आणि शिल्पांचे भव्य प्रदर्शन करण्यासाठी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ‘आर्ट बॉक्स’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर बाबर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, शहराची ओळख केवळ भव्य पूल किंवा मोठ्या प्रकल्पांवरून होत नाही, तर त्या शहरातून घडलेल्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तींमुळे होते. भविष्यात पिंपरी-चिंचवडची ओळख येथील कलाकार आणि क्रीडापटूंमुळे व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे.

या ‘आर्ट बॉक्स’ प्रदर्शनात महापालिकेच्या तब्बल १०० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कलाकृतींची संकल्पना मान्यवरांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची सर्जनशीलता पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

हा कार्यक्रम महापौर रवि लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी नगरसेविका आरती चोंदे, स्नेहा कलाटे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर आणि कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांसह मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. महापालिका शाळांमधील या चिमुकल्या कलाकारांच्या प्रतिभेला दाद देण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी मोठी गर्दी केली होती.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!