news
अकोला एलसीबीचा ‘सापळा’ यशस्वी; शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशनवर आरोपीच्या आवळल्या मुसक्या; पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धडक कारवाईवाहतूक पोलिसांची की गुंडांची टोळी? नाशिक फाटा चौकातील ‘त्या’ प्रकाराने पोलीस प्रतिमा मलीन; वरिष्ठ नागरिकाला ‘अरे-तुरे’ करत दिली दंडाची धमकी“अनुदानाचे तुकडे नकोत, कायद्याचे संरक्षण द्या!”; राजूभाऊ वानखडे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा; ४ प्रमुख मागण्यांसाठी मूर्तीजापुरात एल्गारकराचा भरणा करा आणि जप्तीची कारवाई टाळा! महापालिकेचे थकबाकीदारांना सुवर्णसंधी; १८ विभागीय कार्यालयांची विशेष पथके सक्रिय‘कृषिरत्न’ ते ‘युवा शेतकरी’; विविध गटांतील पुरस्कारांसाठी नोंदणी सुरू; विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांचे आवाहन
Home पिंपरी चिंचवड ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा महापालिकेकडून विशेष गौरव; ‘तमाशा – एक सांस्कृतिक लोकचळवळ’ विषयावर मांडणार विचार

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा महापालिकेकडून विशेष गौरव; ‘तमाशा – एक सांस्कृतिक लोकचळवळ’ विषयावर मांडणार विचार

मराठी भाषेचे समृद्ध वैभव उलगडणार; 'रामकृष्ण मोरे' प्रेक्षागृहात लोककला, साहित्य आणि संगीताचा महाकुंभ, दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठी भाषेचा जागर! पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी सत्कार; ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उद्या, शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा यावेळी विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर खेडकर हे “तमाशा – मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ” या विषयावर आपले विचार मांडतील.

या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शहरातील सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई प्रस्तुत “माय मराठीची गौरवगाथा” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. संदेश विठ्ठल उमप आणि शाहीर पृथ्वीराज माळी यांचा हा कलाविष्कार रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.

  • कविसंमेलन (दु. ३ वाजता): राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निमंत्रित कवींची मैफल रंगणार आहे.

  • परिसंवाद (दु. ४ वाजता): “अभिजात मराठी भाषेचे वैभव” या विषयावर अरुण बोऱ्हाडे, प्रकाश निर्मल आणि डॉ. धनंजय भिसे मार्गदर्शन करतील.

  • लोकगीत संध्या (सां. ६ वाजता): “आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा…” या कार्यक्रमात विजय सरतापे, जगदीश गोरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुरांची मैफल रंगेल.

या कार्यक्रमाचे नियोजन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मराठी भाषेचा अभिमान जपण्यासाठी नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!