news
‘क्रांतिज्योती विद्यालय’चा उद्या भव्य प्रीमियर! मराठी माध्यमाच्या शिक्षणाचे महत्त्व पडद्यावर उलगडणार; सिनेसृष्टीसह राजकीय दिग्गजांची आकुर्डीत मांदियाळीमहापालिकेत आता ‘अभ्यासू’ नेतृत्वाची गरज! ॲड. विद्या शिंदे (भुजबळ) यांच्या नावाची शिफारस; वकील बार असोसिएशनचाही पाठिंबाकॅमेऱ्यामागील विश्वावर रंगली चर्चा! ‘पिंपरी-चिंचवड फिल्म फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस यशस्वी; साऊंड डिझाइन ते सिनेमॅटोग्राफीच्या तांत्रिक बारकाव्यांवर दिग्गजांनी उघडले गुपितकर्मवीर भाऊराव पाटील शाळेत रंगला ‘साहित्य वाटप’ सोहळा! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली मने; १३१ गरजू विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक साधनांचे पाठबळसावध राहा! मुर्तीजापुरात मुले पळवण्याच्या संशयावरून महिलेला घेतले ताब्यात; लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमुळे शहरात चिंतेचे सावट
Home पिंपरी चिंचवड गदिमा नाट्यगृहात रंगली ‘सिने-मांदियाळी’! चित्रपट हा प्रबोधनाचा अन् संस्कारांचा आरसा; सिल्वेस्टर स्टॅलोनच्या संघर्षाचा दाखला देत महापौरांनी उलगडला चित्रपटांचा महिमा

गदिमा नाट्यगृहात रंगली ‘सिने-मांदियाळी’! चित्रपट हा प्रबोधनाचा अन् संस्कारांचा आरसा; सिल्वेस्टर स्टॅलोनच्या संघर्षाचा दाखला देत महापौरांनी उलगडला चित्रपटांचा महिमा

जागतिक नकाशावर शहराचा ठसा! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते 'पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे उद्घाटन; ३ ते ५ मार्च दरम्यान देश-विदेशातील दर्जेदार चित्रपटांचे विनामूल्य प्रदर्शन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा! ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चा गदिमा नाट्यगृहात दिमाखदार प्रारंभ; जागतिक सिनेमाची मेजवानी आता शहरवासीयांच्या दारी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०४ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सकारात्मक जीवन घडवण्याचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर आता जागतिक सांस्कृतिक नकाशावर आपला ठसा उमटवत आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ चे उद्घाटन आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महापौरांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. ३ ते ५ मार्च या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील दर्जेदार चित्रपट रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.

उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या संघर्शमय प्रवासाचा दाखला देत अपयशाने न खचण्याचा संदेश दिला. “मी स्वतः चित्रपट रसिक आहे. चित्रपट आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. भविष्यात या महोत्सवाला अधिक भव्य स्वरूप देण्याचा आमचा मानस आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवडची ओळख ‘सांस्कृतिक उपराजधानी’ म्हणून होत असल्याचा आनंद व्यक्त केला. तर, उपमहापौर शर्मिला बाबर आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी शहरातील कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या महापालिकेच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. क्रीडा व कला समिती सभापती कैलास कुटे यांनी चित्रपटांना ‘समाजाचा आरसा’ संबोधत नागरिकांना या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याला प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेता क्षितिज दाते, उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘शिवांजली डान्स अकॅडमी’च्या कलाकारांनी सादर केलेल्या मनमोहक कथक नृत्याने झाली.

या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य :

  • ३ ते ५ मार्च २०२६ या काळात गदिमा नाट्यगृहात प्रदर्शन.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांचे विनामूल्य स्क्रीनिंग.

  • स्थानिक कलाकारांना जागतिक तंत्रज्ञानाची ओळख होण्याची संधी.

या सोहळ्याचे प्रास्ताविक पंकज पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन चैतन्य कुलकर्णी यांनी केले. आभार किरण गायकवाड यांनी मानले. यावेळी दत्ता गुंड, अभिषेक अवचार, डॉ. विश्वास शेंबेकर व इतर चित्रपट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!