news
महिला सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय! कार्यालयांमध्ये ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ न केल्यास ५० हजारांचा दंडपुनावळे प्रकल्पाचा विरोध मोशी दुर्घटनेला कारणीभूत; सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा विरोधकांवर थेट हल्लामोशी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प दुर्घटना: काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे आयुक्तांना पत्र; ‘अँथोनी लारा’ कंपनीवर कारवाईची मागणीदापोडीत संतांच्या समता विचारांचा जागर! मुसळधार पावसात काँग्रेसकडून वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपपिंपरी-चिंचवड मनपाचा ‘क्लीन वारी’ पॅटर्न यशस्वी! लाखांचा जनसमुदाय ओसरताच अवघ्या दोन तासांत शहर चकाचक
Home पिंपरी चिंचवड रहाटणीतील निसर्ग कॉलनीचा कायापालट! ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्येतून नागरिकांची मुक्तता

रहाटणीतील निसर्ग कॉलनीचा कायापालट! ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्येतून नागरिकांची मुक्तता

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विकासगंगा; नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शास्त्रीनगरमधील निसर्ग कॉलनीत रखडलेले ड्रेनेज व डांबरीकरणाचे काम पूर्ण; रहिवाशांना मोठा दिलासा

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दिनांक: २ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

रहाटणी: शास्त्री नगर परिसरातील निसर्ग कॉलनीमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले ड्रेनेज लाईन आणि रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

निसर्ग कॉलनीतील ड्रेनेजची व्यवस्था कोलमडल्याने आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता या भागातील पायाभूत सुविधांचे काम पूर्णत्वास गेले आहे.

या विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, महापालिका स्थापत्य विभागाच्या उपअभियंता वंदना मोरे, कनिष्ठ अभियंता अमित पवार यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी राम नखाते, दिनेश चिकणे, विजय कदम, अक्षय बावणे, धोंडीराम मनवे, राजेंद्र पवार, वैजयंती जागडे, संगीता नखाते, लक्ष्मी चिकणे, अश्विनी चिकणे आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

“नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे हे आमचे कर्तव्य आहे. शास्त्रीनगर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यातही प्रभागातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातील,” असे प्रतिपादन नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी यावेळी केले.

प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर भर देऊन आदर्श प्रभाग निर्माण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. निसर्ग कॉलनीतील नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत जनसेवकांचे आभार मानले आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!