news
Home अहिल्या नगर विमान इंधन चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त! एलसीबीने ८८ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

विमान इंधन चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त! एलसीबीने ८८ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी झडती; तिघांना बेड्या, बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अहिल्यानगर: ४५ लाखांचे विमान इंधन चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 

 

अहिल्यानगर (अहमदनगर), दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अहिल्यानगर (अहमदनगर): विमान इंधनाची (ATF) चोरी करून त्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे छापा टाकून तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे विमान इंधन आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण ८८.५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी गव्हाणेवाडी येथील एका हॉटेलच्या मागे विमानाचे इंधन बेकायदेशीरपणे साठवले जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने हॉटेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी एका टँकरमधून विमानाचे इंधन मोठ्या ड्रममध्ये भरताना रंगेहात पकडले गेले. टँकरचे सील तोडून हे इंधन चोरले जात असल्याची कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान दिली.

१) मुकेश सिंह (वय २६, रा. उत्तर प्रदेश)

२) रामभवन राजपूत (वय ३२, रा. उत्तर प्रदेश)

३) चंदू जांभळकर (वय ४१, रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
  • विमान इंधन (ATF): २८,००० लिटर इंधनाने भरलेला टँकर (किंमत ४५ लाख रुपये).

  • टँकर: ४० लाख रुपये किमतीचा टँकर.

  • साठवलेले इंधन: सहा ड्रममध्ये भरलेले १२,००० लिटर इंधन (किंमत १.९ लाख रुपये).

  • एकूण जप्त ऐवज: ८८.५ लाख रुपये.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ (ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणा), ३१८(४) (फसवणूक), ३०३(२) (चोरी) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा आणि स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण काबाडी करत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!