news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड मोशीकरांसाठी आनंदाची बातमी! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भव्य अ‍ॅमेनिटी स्पेसचे भूमिपूजन

मोशीकरांसाठी आनंदाची बातमी! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भव्य अ‍ॅमेनिटी स्पेसचे भूमिपूजन

व्हॉलीबॉल, बॅडमिंटन कोर्टसह अम्पिथिएटरची मेजवानी; ९ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी-बोऱ्हाडेवाडीच्या विकासाला नवी दिशा! २ कोटी ७२ लाखांच्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्यदायी आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर लांडगे यांच्या हस्ते सोमवारी (६ एप्रिल) उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पासाठी २ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, ‘एस.एस. आर्किटेक्टस’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी ९ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या मोशी परिसरात सुसज्ज सार्वजनिक जागेची गरज ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. यामध्ये खालील सुविधांचा समावेश असेल:

  • क्रीडा सुविधा: व्हॉलीबॉल कोर्ट (४८० चौ.मी.), बॅडमिंटन कोर्ट (३५० चौ.मी.) आणि १५५० चौ.मी. चे विस्तीर्ण बहुउद्देशीय मैदान.

  • आरोग्य: योगा कोर्ट (१६० चौ.मी.) आणि चालण्यासाठी प्रशस्त पादचारी मार्ग.

  • बालकांसाठी: सॅन्ड पिट (जंगल जिम – १०० चौ.मी.).

  • सांस्कृतिक व इतर: अम्पिथिएटर, बैठक व्यवस्था, सुसज्ज स्वच्छतागृह आणि पार्किंग व्यवस्था.

स्थानिक तरुणांना एकाच ठिकाणी खेळाच्या विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळेल. तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ परिसर उपलब्ध होणार असल्याने सामाजिक संवाद आणि सकारात्मक वातावरणाला चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमास पालिकेच्या विधी समिती सभापती सुजाता बोराटे, माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे, कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच निलेश बोराटे, आतिश बारणे, शिवाजी बारणे यांच्यासह स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!