news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले! पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारीवर मोठा प्रहार

शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले! पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारीवर मोठा प्रहार

चाकण, महाळुंगे परिसरातील अट्टल गुन्हेगारांना एमपीडीएचा दणका; येरवडा, कोल्हापूर, नागपूर जेलमध्ये रवानगी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! ४ अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई; थेट नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि येरवडा कारागृहात रवानगी

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दहशत माजविणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ४ धोकादायक गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांची रवानगी राज्यातील विविध मध्यवर्ती कारागृहात १ वर्षासाठी करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पीसीबी (गुन्हे शाखा) आणि संबंधित पोलीस ठाण्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार आणि त्यांचे रेकॉर्ड:

१) रामदास मारुती साळुंके (वय ३७, रा. आंबेठाण, खेड):

  • कार्यक्षेत्र: महाळुंगे, चाकण, खेड, शिक्रापूर.

  • गुन्हे: खून, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, अपहण यांसारखे एकूण ०८ गंभीर गुन्हे.

  • कारावास: नागपूर मध्यवर्ती कारागृह.

२) अर्जुन बिरबल राठोड (वय ४१, रा. रासे, खेड):

  • कार्यक्षेत्र: चाकण.

  • गुन्हे: गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे यांसारखे ०५ गुन्हे.

  • कारावास: हर्सूल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर.

३) शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७, रा. रिहे, मुळशी):

  • कार्यक्षेत्र: महाळुंगे, चाकण, हिंजवडी, पौड.

  • गुन्हे: खून, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे यांसारखे ०५ गंभीर गुन्हे.

  • कारावास: कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर.

४) रजीत लक्ष्मण येरकर (वय १९, रा. नाणेकरवाडी, खेड):

  • कार्यक्षेत्र: महाळुंगे एमआयडीसी, चाकण.

  • गुन्हे: खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणीसाठी अपहरण, दहशत माजविणे यांसारखे ०३ गंभीर गुन्हे.

  • कारावास: येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे.

पोलीस आयुक्तांनी जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत आतापर्यंत एकूण ४ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. मागील वर्षी (२०२५) तब्बल ३५ गुन्हेगारांना या कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते, ज्यामुळे शहरातील गुन्हेगारीत मोठी घट झाली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवरज तेली, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, श्वेता खेडकर, मारुती जगताप, विशाल हिरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, चाकणचे जितेंद्र कदम, पीसीबी गुन्हे शाखेच्या रुपाली बोबडे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!