news
Home पिंपरी चिंचवड मोशीत रंगली बालगोपालांची ‘रामलीला’! मोबाईल सोडून मुले सांस्कृतिक सोहळ्यात मग्न

मोशीत रंगली बालगोपालांची ‘रामलीला’! मोबाईल सोडून मुले सांस्कृतिक सोहळ्यात मग्न

केंद्रीय विहार सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सुविधा बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून संस्कृती व क्रीडा उपक्रमांत सहभागी करा; केंद्रीय विहार सोसायटीत ‘रामलीला’ उत्साहात संपन्न

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, मोशी: “आजच्या डिजिटल युगात लहान मुले मोबाईलच्या जाळ्यात अडकत चालली आहेत. त्यांना यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना आपल्या कला, संस्कृतीची ओळख करून देणे गरजेचे आहे. मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे प्रतिपादन मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी केले.

रामनवमीच्या निमित्ताने मोशी प्राधिकरण सेक्टर ४ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये बालगोपालांसाठी विशेष ‘रामलीला’ आणि ‘गोल्डन टेन डेज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (४ एप्रिल) श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सोसायटीतील ३० चिमुकल्यांनी ‘रामलीला’ सादर केली. यामध्ये रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करून मुलांनी उपस्थितांची मने जिंकली. या रामलीलेचे लेखन आणि नृत्य मार्गदर्शन सुविधा बोऱ्हाडे यांनी केले, तर वेशभूषेची जबाबदारी कृपा छत्राला आणि रिसील छत्राला यांनी सांभाळली.

मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी १० दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या आणि यशस्वी ठरलेल्या सुमारे ५० मुलांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यशस्वी मुले आणि सहभागी कलाकार:

  • रामलीला सहभागी: आर्या गुट्टे, कृपा खांडेकर, रुत्वी जोशी, प्रार्थना चतरला, हंसी पटेल, दुर्वा पाटील, सौम्या खोल्लम, निया गुट्टे, श्रुतिका गवळी, रिया कडपट्टी, ज्ञानेश्वरी बनसोडे, परी शिंदे, अविका, अद्वैत कुलकर्णी, धनिका धोंडी, श्री खांडेकर, राजवीर जाधव, अवनीश हांडे, प्रतम छत्रला, जोष्णिका बोयापती, त्रिशा जगताप, श्लोक बोऱ्हाडे, पार्थ शिंदे, दिया हरणे, प्रियन पटेल, आरव कुलकर्णी, स्वरा खांडेकर, शाशा पावडे आणि सहर्ष गवळी.

  • गोल्डन टेन डेज विजेते: देवांश खांडेकर, हृदय गोहेल, खुशार्थ पटेल, वेद अरगडे, स्मित जयेश, मुदित बोरा, निधिश बोरा, देवांश आढळराव, आरुष जाधव, ध्वती मेघपारा, शारश गवळी, अवनी नरवडे, तक्ष पटेल, सात्विक भोपळे, यशश्री आमले, अवंती राऊत, आर्य जगताप, दिव्यांश हरणे, देबुदत्त चक्र.

या सोहळ्याला केंद्रीय विहार सोसायटीचे अध्यक्ष दिलीप तायडे, सचिव मुकुंद पवार, कार्यक्रम संयोजक सुविधा बोऱ्हाडे, सांस्कृतिक कमिटी अध्यक्ष सोनाली हरणे, लालचंद जाधव, अंबादास चौधरी, प्रकाश खोल्लम, मंगेश बोऱ्हाडे, गजानन शिंदे, राधाकृष्ण केदार, प्रीती गाडे, दीपक निंबार्ते, सौरभ जोगळेकर, मंगेश ओवाढकर, अमित शेरे, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर हरणे, अविनाश पवार, रघुनाथ बिरदवडे, दिपक धोंडी, ॲड. स्वाती पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे मुलांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. संस्कृती जतन करण्याच्या या प्रयत्नाचे सर्व पालकांनी कौतुक केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!