news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड शहरातील दहशत मोडीत काढणार! पिंपरी-चिंचवडमध्ये १६ टोळ्यांवर ‘मोका’चा दणका

शहरातील दहशत मोडीत काढणार! पिंपरी-चिंचवडमध्ये १६ टोळ्यांवर ‘मोका’चा दणका

हिंजवडी, काळेवाडी आणि चाकणमधील सराईत टोळ्या पोलिसांच्या जाळ्यात; संघटित गुन्हेगारीविरोधात आयुक्तालयाचा 'ॲक्शन मोड' | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारीवर मोठा प्रहार; १६ टोळ्यांमधील ७९ गुन्हेगारांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

 

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: शहरातील संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते मार्च २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ गुन्हेगारी टोळ्यांमधील ७९ सराईत गुन्हेगारांवर ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम – १९९९) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.

शहरात दहशत निर्माण करणाऱ्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अमली पदार्थ विक्री, जबरी चोरी आणि बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या खालील प्रमुख टोळ्यांवर ही कारवाई झाली आहे:

१. काळेवाडी पोलीस ठाणे: विशाल उर्फ मन्या भीमराव कांबळे आणि सनी राजू गायकवाड यांच्या टोळीवर कारवाई. या टोळीवर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

२. बावधन पोलीस ठाणे: शुभम संभाजी गोळे आणि ऋषिकेश उर्फ सागर गोळे यांच्या टोळीवर ५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

३. हिंजवडी पोलीस ठाणे: दयामन्ना उर्फ सुनील शिवपुरे आणि दुर्गाप्पा श्रीराम यांच्या टोळीवर तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

४. निगडी पोलीस ठाणे: रोहन मारुती गुंडीले आणि त्याच्या ४ साथीदारांवर ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

५. रावेत पोलीस ठाणे: हुसेन इलियास डांगे आणि त्याच्या साथीदारांवर ५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

६. चिंचवड पोलीस ठाणे: बसुराज उर्फ बश्या शंकर हेळवे आणि त्याच्या टोळीवर ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

७. काळेवाडी (दुसरी कारवाई): वैभव व्यंकट नागझरकर आणि त्याच्या साथीदारांवर ४ गंभीर गुन्हे आहेत.

८. हिंजवडी (दुसरी कारवाई): जलालुद्दीन उर्फ सोनू निजामुद्दीन शेख आणि त्याच्या ८ साथीदारांवर ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

९. चाकण दक्षिण पोलीस ठाणे: विराज कृष्णा कड आणि त्याच्या साथीदारांवर १४ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

१०. दिघी पोलीस ठाणे: दिवाकर सुरेंद्र सिंग आणि त्याच्या ४ साथीदारांवर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

११. सांगवी पोलीस ठाणे: विराज अधिकराव काटे आणि त्याच्या ८ साथीदारांवर ७ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

१२. दापोडी पोलीस ठाणे: विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे आणि त्याच्या ३ साथीदारांवर ९ गंभीर गुन्हे आहेत.

१३. रावेत (दुसरी कारवाई): विनोद उर्फ विनया निजप्पा गायकवाड आणि साथीदारांवर १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

१४. एमआयडीसी भोसरी: किशोर नारायण ढवळे आणि मनोज गायकवाड यांच्यावर ८ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

१५. काळेवाडी (तिसरी कारवाई): आदर्श उर्फ आद्या अनिल कामटीकर आणि साथीदारांवर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

१६. काळेवाडी (चौथी कारवाई): विकी अनिल घोलप आणि त्याच्या ६ साथीदारांवर १२ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले आहे की, शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांची गय केली जाणार नाही. २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४५ टोळ्यांमधील २२८ आरोपींवर मोका लावला होता. ही मोहीम २०२६ मध्येही अधिक तीव्र करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशांक महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, श्री. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त श्री. संदीप आटोळे, श्री. विशाल गायकवाड, श्री. मारुती जगताप, श्री. शिवाजी पवार आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!