news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home यवतमाळ महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मैदानात! ई-केवायसीच्या मुदतीवरून सरकारला घेरले

महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मैदानात! ई-केवायसीच्या मुदतीवरून सरकारला घेरले

कळंब येथे मनीषा काटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं; तांत्रिक अडचणींमुळे लाखो महिला लाभापासून वंचित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ द्या; राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आक्रमक

 

 

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: नरेश राऊत, दिनांक: ८ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

यवतमाळ/कळंब: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) वतीने कळंब येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२५ ची मुदत संपल्यामुळे राज्यातील लाखो गरजू महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, शासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, असे निवेदन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना पाठवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे तालुका अध्यक्ष दिलीपराव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले) यांच्या पुढाकाराने शेकडो महिलांच्या उपस्थितीत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, ई-केवायसी करताना महिलांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे:

  • सर्वर व तांत्रिक अडचणी: सीएससी (CSC) सेंटरवर सतत सर्वर डाऊन असणे आणि नेटवर्कच्या समस्या.

  • आधार सीडिंग: आधार क्रमांक चुकीचे असणे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे (Aadhar Seeding).

  • अति गर्दी: मुदत संपत असताना केंद्रांवर झालेली प्रचंड गर्दी यामुळे अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे.

ज्या महिलांची परिस्थिती बेताची आहे आणि ज्यांना या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, अशा महिलाच तांत्रिक कारणांमुळे योजनेबाहेर फेकल्य गेल्या आहेत. केवळ कळंब तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची हीच स्थिती असल्याने सरसकट मुदतवाढ देऊन दिलासा देण्यात यावा, अशी मागणी मनीषा काटे यांनी केली आहे.

शासनाने जर ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली नाही, तर महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

याप्रसंगी सुधाकर निखाडे, विजय पोटे, प्रशांत भोयर, सुषमा पाटील, ओमकार चव्हाण, अरुणा अतकरे, नागोराव किन्हेकर यांच्यासह रंजना ठोंबरे, किरण सूर्यवंशी, शकीला शेख, पपिता पाटील, रुपाली देवाडे, नंदा शिरसागर, वैशाली राऊत, वनमाला नेहारे आणि शेकडो महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!