news
Home पुणे बारामतीचा विकास ‘खोळंबला’! सुप्रिया सुळेंचा पीएमआरडीएला ‘रोखठोक’ सवाल!

बारामतीचा विकास ‘खोळंबला’! सुप्रिया सुळेंचा पीएमआरडीएला ‘रोखठोक’ सवाल!

बनेश्वर रस्ता, रिंगरोड आणि वाहतूक कोंडी; रखडलेल्या प्रकल्पांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बारामतीचा विकास धगधगतोय! सुप्रिया सुळेंनी पीएमआरडीए आयुक्तांना धारेवर धरलं!

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा रथ रखडलेला पाहून संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे आज अक्षरशः आक्रमक झाल्या! त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आयुक्तांना थेट धारेवर धरत, मतदार संघातील रखडलेल्या प्रकल्पांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. बनेश्वर रस्त्याची दुर्दशा, रिंगरोडची संथ गती आणि वाहतूक कोंडीचा वाढता त्रास या मुद्द्यांवर त्यांनी आयुक्तांना जाब विचारला!

आज झालेल्या बैठकीत, सुप्रिया सुळेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी श्री क्षेत्र बनेश्वरच्या रस्त्याची दयनीय अवस्था मांडत, भाविकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. “अजून किती दिवस हा रस्ता असाच धूळ खात राहणार?” असा थेट सवाल त्यांनी आयुक्तांना विचारला. रिंगरोडच्या कामाची गती वाढवण्याची आणि वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी रेटून धरली.

“बारामतीकरांना वेठीस धरू नका! विकासकामांना गती द्या!” असा स्पष्ट इशारा सुप्रिया सुळेंनी पीएमआरडीए आयुक्तांना दिला. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.

पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. “बारामतीकरांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या या भूमिकेबद्दल आभार मानले.

या बैठकीला पीएमआरडीएचे उच्चपदस्थ अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आज दाखवलेली आक्रमकता लक्षणीय ठरली.

बारामतीच्या विकासासाठी सुप्रिया सुळेंचा हा ‘ॲक्शन मोड’ तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!