news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड नदी प्रदूषणाबद्दल भिगवणच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी!

नदी प्रदूषणाबद्दल भिगवणच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी!

पुणे-पिंपरी चिंचवडमधील नद्यांच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट! मारुती भापकरांनी कबूल केली चूक!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणामुळे भिगवण भागातील शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या गंभीर समस्येबद्दल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

आज, १६ मे २०२५ रोजी भिगवण येथे आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि पुणे व पिंपरी चिंचवडमधील पर्यावरण कार्यकर्त्यांनी उजनी परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान तलावाची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर भिगवण येथील दुर्गा मंदिरात शेतकऱ्यांची जनजागृती बैठक झाली.

या बैठकीत बोलताना मारुती भापकर यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नद्या प्रदूषित होण्यास शहरवासी जबाबदार असल्याचे स्पष्टपणे कबूल केले. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागताना म्हटले की, “पवना, इंद्रायणी, मुळा आणि मुठा या नद्या प्रदूषित करण्याचे पाप आमचेच आहे. आम्ही आपले गुन्हेगार आहोत आणि आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल आम्ही आपल्या चरणी नतमस्तक होऊन जाहीर माफी मागत आहोत.”

भापकर यांनी पुढे आश्वासन दिले की, यापुढे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे शहरवासीयांकडून नद्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. यासाठी महापालिका, पर्यावरण विभाग, एमआयडीसी, पीएमआरडीए आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे एकत्रितपणे लढा देण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मिसळणारे मैलायुक्त पाणी, एमआयडीसीचे रासायनिक पाणी आणि प्लास्टिक कचरा यामुळे भीमा नदी प्रदूषित होते. याच दूषित पाण्यामुळे उजनी धरण आणि भीमा-चंद्रभागा नद्यांवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच, यामुळे त्वचारोग, पोटाचे विकार आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले आणि पुढील दिशा स्पष्ट केली. भिगवणच्या ग्रामस्थांनी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. मारुती भापकर यांनी त्यांचे आभार मानले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!