news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये उपजीविकेच्या संधींवर मंथन!

पिंपरी-चिंचवडमध्ये उपजीविकेच्या संधींवर मंथन!

दोन दिवसीय गट चर्चेत १८० हून अधिक भागधारकांचा सहभाग!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शहर उपजीविका कृती आराखडा’ उपक्रमांतर्गत दोन दिवसीय विशेष गट चर्चा नुकतीच संपन्न झाली.

शहरातील उपजीविकेच्या संधी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या दोन दिवसीय (२१ व २२ मे २०२५) बैठकीत उद्योग, शासकीय विभाग, पतसंस्था, सामाजिक संघटना आणि नागरी समाजातील १८० हून अधिक प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला.

पहिल्या दिवशी, २१ मे रोजी सकाळच्या सत्रात विविध कंपन्यांचे एचआर लीडर्स आणि प्रशिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी नव्या पिढीची मानसिकता, कामाच्या अपेक्षा आणि रोजगारातील अडचणी यावर विचारविनिमय केला. दुपारच्या सत्रात उद्योग-व्यवसाय, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि वित्त क्षेत्रातील प्रतिनिधींनी कर्जपुरवठा, व्यवसायासाठी जागा आणि स्वयंरोजगार प्रशिक्षणासंबंधी मुद्दे मांडले.

दुसऱ्या दिवशी, २२ मे रोजी वाहतूक, आरोग्य, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अपुरी माहिती आणि आर्थिक मदतीचा अभाव यांसारख्या आव्हानांवर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, स्वयं सहायता गट, महिला उद्योजक, ट्रान्सजेंडर समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींच्या उपजीविकेच्या संधींवर विचारमंथन झाले. सामाजिक भेदभाव आणि समावेशक सुविधांच्या कमतरतेवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

या गटचर्चेदरम्यान शासकीय योजनांची माहिती आणि लाभ अनेक घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट झाले. महिला उद्योजकांनी बाजारपेठ आणि पतपुरवठ्यावर जोर दिला, तर युवक आणि उद्योग क्षेत्रांनी कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेवर लक्ष वेधले. ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग व्यक्तींनी सन्मान आणि गरजेनुसार योजनांची मागणी केली.

‘शहर उपजीविका कृती आराखडा’ हा राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा (NULM) भाग असून, शहरात सर्वांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या दोन दिवसांच्या चर्चेतून मिळालेल्या सूचनांच्या आधारे आता आराखड्याचा मसुदा तयार केला जाईल आणि लवकरच तो नागरिकांच्या मतासाठी खुला केला जाईल.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!