news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड राजकीय ‘महा-धमाका’: १७ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दोन पवार’ आमनेसामने!

राजकीय ‘महा-धमाका’: १७ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दोन पवार’ आमनेसामने!

निष्ठावंतांशी शरद पवार साधणार संवाद, तर अजित पवारांच्या उपस्थितीत होणार भव्य पक्षप्रवेश; महापालिका निवडणुकीपूर्वी शहराचे राजकारण ढवळून निघणार! (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय ‘महा-धमाका’! १७ जून रोजी ‘दोन पवार’ आमनेसामने; निष्ठावंतांशी शरद पवार साधणार संवाद, तर अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश!

‘मिशन PCMC’ साठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची मोर्चेबांधणी; महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील राजकारण ढवळून निघणार!

पिंपरी-चिंचवड, १३ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकारण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार गट आता नव्या जोमाने मैदानात उतरला असून, पक्षाच्या आगामी रणनीतीची आखणी आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी दि. १७ जून २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे आयोजन ताथवडे येथील सिल्व्हर बँक्वेट हॉल येथे करण्यात आले आहे.


‘मिशन PCMC’: निष्ठावंतांशी संवाद साधणार सर्वेसर्वा शरद पवार!

या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, संघटन बळकट करणे आणि स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. पक्षातील गटबाजी, पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षाची एकी आणि ताकद दाखवणे हाही या बैठकीमागील उद्देश असल्याचे निरीक्षक प्रकाश आप्पा मस्के यांनी सांगितले. या बैठकीत वॉर्डनिहाय संघटन, संभाव्य उमेदवार, प्रचार यंत्रणा आणि सोशल मीडिया आघाडीवर कार्यकर्त्यांना दिशा दिली जणार आहे.


एकाच दिवशी दोन पवार! पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय ‘महा-धमाका’!

१७ जून हा दिवस पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शहरात येणार आहेत! सकाळी ताथवडे येथील हॉलमध्ये शरद पवार यांची आढावा बैठक होणार आहे, तर त्याच दिवशी दुपारी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. एकाच दिवशी राष्ट्रवादीत होणारी ही उलथापालथ शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी ठरणार आहे.


अजित गव्हाणे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. गव्हाणे यांचा मुहूर्त ठरला असून, दि. १७ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत २५ माजी नगरसेवकांची टीम असल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसेल, असा दावा केला जातो आहे.

राज्यातील राजकीय उलथापालथ, बदलते समीकरण आणि कार्यकर्त्यांच्या बदलत्या निष्ठा यांच्याशी सामना करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) नव्या जोमाने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. प्रकाश आप्पा मस्के यांनी म्हटल्याप्रमाणे, ही बैठक म्हणजे केवळ आढावा नाही, तर एक राजकीय निर्धार ठरणार आहे. १७ जून रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये होणारा हा राजकीय ‘महा-धमाका’ महापालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ घडवून आणणार हे निश्चित!


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!