news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांगांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू! आयुक्त शेखर सिंहांकडून कौशल्य विकासावर भर

पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांगांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू! आयुक्त शेखर सिंहांकडून कौशल्य विकासावर भर

दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये केंद्राची शानदार सुरुवात; दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिव्यांग बांधवांमधील कौशल्यांचे विश्लेषण करण्यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उपयुक्त ठरेल – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये केंद्राची शानदार सुरुवात

पिंपरी, दि. ३० जुलै २०२५ , मॅक्स मंथन डेली न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये सुरू करण्यात आलेले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे केंद्र दिव्यांग बांधवांमधील सुप्त कौशल्यांचे विश्लेषण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींमधील कौशल्ये शोधून त्यांना योग्य काम मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाईल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

केंद्राचे उद्घाटन आणि प्रमुख उपस्थिती

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे इनबेल इंडिया आणि रोहिणी संस्था यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे उद्घाटन आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महापालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदीता घार्गे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, इनबेल इंडिया संस्थेच्या शांती राघवन, रोहिणी संस्थेचे अक्षय सरोदे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, खासगी कंपनीचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आयुक्तांचे मार्गदर्शन: दिव्यांगांना सक्षम करण्याचा नवा मार्ग

आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘दिव्यांग बांधवांसाठी वर्क प्लेस सोल्युशन शोधण्यासाठी महापालिकेमार्फत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिव्यांगांना औद्योगिक क्षेत्रामध्ये काम मिळावे, यासाठी लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. इनबेल इंडिया व रोहिणी संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मुळे आता दिव्यांग व्यक्तीमधील कौशल्य ओळखून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांना नोकरी देणे शक्य होणार आहे. दिव्यांग व्यक्तीला येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर कशा प्रकारे ते मात करू शकतात, याबाबतही माहिती या केंद्रातून मिळू शकणार आहे. दिव्यांग व्यक्ती विविध क्षेत्रात कशा प्रकारे काम करू शकतात, याची माहितीही येथे मिळणार आहे. त्यामुळे हे केंद्र खऱ्या अर्थाने दिव्यांगांना सक्षम करण्यास उपयुक्त ठरणार आहे.’

सर्वेक्षण आणि कौशल्याधारित रोजगारावर भर

व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी दिव्यांग भवनच्या कामाबाबत माहिती देताना दिव्यांगांचे सर्वेक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘दिव्यांगांच्या सर्वेक्षणातून जी माहिती संकलित होईल, त्याचे विश्लेषण करून कामाची गती वाढवता येईल. दिव्यांगांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.’

उपायुक्त ममता शिंदे यांनी सांगितले की, ‘दिव्यांग बांधवांसाठी काम करताना भाषेचा अडथळा कुठेही येणार नाही, यादृष्टीनेही आम्ही नियोजन करीत आहोत. पुढील पाच वर्षात जास्तीतजास्त दिव्यांगांना कौशल्याआधारित रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यास प्राधान्य दिले जात आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांनी केले, तर सूत्रसंचालन आर्या तेंडूलकर यांनी केले. परेश गांधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आयुक्तांनी घेतली केंद्राची सविस्तर माहिती

‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे उदघाटन केल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी इनबेल इंडियाच्या शांती राघवन व रोहिणी संस्थेचे अक्षय सरोदे यांच्याकडून केंद्राबाबत सविस्तर माहिती घेतली. दिव्यांग व्यक्तीला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे सेंटर कसे उपयोगी पडू शकते, याबाबत सविस्तर माहिती शांती राघवन यांनी दिली, तर दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या सेंटरचा कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत माहिती अक्षय सरोदे यांनी दिली.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!