news
Home पिंपरी चिंचवड २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर! – ग्रामीण व निमशहरी राजकारणावर थेट परिणाम, तात्काळ आचारसंहिता लागू

२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर! – ग्रामीण व निमशहरी राजकारणावर थेट परिणाम, तात्काळ आचारसंहिता लागू

उमेदवारांची निश्चिती आणि प्रचारसभांचा जोर वाढणार; १७ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख.(© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

राज्यात ‘निवडणुकीची रणधुमाळी’! २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला; अर्ज दाखल करण्यापासून मतमोजणीपर्यंत संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

 

 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून २ डिसेंबरला मतदान; निवडणूक आचारसंहिता लागू

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ४ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण राज्यात ‘निवडणुकीची रणधुमाळी’ सुरू झाली असून, राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ठिकाणी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल स्पष्ट होतील. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच, संबंधित क्षेत्रात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेले महत्त्वाचे वेळापत्रक (२०२५):

  • अर्ज दाखल करण्यास सुरुवात: १० नोव्हेंबर
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: १७ नोव्हेंबर
  • अर्जांची छाननी: १८ नोव्हेंबर
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: २५ नोव्हेंबर
  • मतदान: २ डिसेंबर
  • मतमोजणी: ३ डिसेंबर

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने ग्रामीण आणि निमशहरी राजकारणावर याचा थेट परिणाम होणार आहे. अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर तारीख निश्चित झाल्याने आता उमेदवारांची निश्चिती आणि प्रचारसभांचा जोर वाढणार आहे.

२८८ संस्थांमध्ये होणारी ही निवडणूक अनेक स्थानिक मुद्द्यांवर लढली जाणार असून, महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने या निकालांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे पाळले जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!