news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड आकुर्डीत ३ ते ७ डिसेंबरपर्यंत कलाकारांची मांदियाळी! सुहास जोशी यांच्या ‘नमस्कार फाउंडेशन’कडून ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन आणि नाटकांची मेजवानी

आकुर्डीत ३ ते ७ डिसेंबरपर्यंत कलाकारांची मांदियाळी! सुहास जोशी यांच्या ‘नमस्कार फाउंडेशन’कडून ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन आणि नाटकांची मेजवानी

सागर कारंडे, संतोष पवार, शलाका पवार यांचे कौटुंबिक नाटक; सलीम शिकलगार यांच्या पुढाकाराने सुरू असलेला 'रोटी बँक' उपक्रमही चर्चेत. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आकुर्डीत पाच दिवसांची सांस्कृतिक-आरोग्य मेजवानी! ‘नमस्कार महोत्सव २०२५’ मध्ये भाऊ कदमचे गाजलेले नाटक ‘मोफत’

 

‘मधुमेह-सांधेदुखी मुक्त शहर’ अभियानासह ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन आणि कलाकारांची मांदियाळी

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दर्जेदार सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक कार्यक्रमांची मोफत मेजवानी देण्यासाठी नमस्कार फाउंडेशनच्या वतीने “नमस्कार महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ३ डिसेंबर ते रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आकुर्डी, प्राधिकरण येथील महापौर निवास, नियोजित जागा येथे हा महोत्सव रंगणार आहे.

नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावर्षीच्या महोत्सवासाठी अनुप मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

या महोत्सवात प्रेक्षकांना विविध हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्यांचे कार्यक्रम, गाजलेली नाटके आणि विनोदी एकपात्री प्रयोगांची मोफत मेजवानी मिळणार आहे.

  • बुधवार (दि. ३ डिसेंबर): सायं. ७ वाजता ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन आणि रात्री ८ वाजता निगडी येथील शब्दरंग, कला, साहित्य कट्टा या संस्थेचा “इंद्रधनु” हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

  • गुरुवार (दि. ४ डिसेंबर): सायं. ६:३० वाजता “म्युझिकल मेलडी” हा सुरेल गीतांचा कार्यक्रम होईल, त्यानंतर रात्री ८:३० वाजता शरद जाधव यांचा “हास्ययात्रा” हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे.

  • शुक्रवार (दि. ५ डिसेंबर): सायं. ७ वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक व कलाकार महेश वामन मांजरेकर यांनी सादर केलेले आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेले “करून गेलो गाव” हे हास्याचे फवारे उडवणारे प्रसिद्ध नाटक होणार आहे.

  • शनिवार (दि. ६ डिसेंबर): रात्री ८:३० वाजता, प्रसिद्ध कलाकार अजितकुमार कोष्टी यांचा क्षणोक्षणी हास्याची कारंजी उडवणारा बहारदार “हसवणूक” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

  • रविवार (दि. ७ डिसेंबर): महोत्सवाचा समारोप सायं. ७ वाजता, संपूर्ण कुटुंबाला कौटुंबिक मनोरंजन देणारे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांचे “हीच खरी फॅमिली ची गंमत आहे” या कौटुंबिक नाटकाने होईल. यात सागर कारंडे आणि संतोष पवार या प्रसिद्ध कलाकारांसह शलाका पवार, हर्षदा कर्वे, प्रतीक पाद्ये, विनिषा कुळकर्णी आणि राकेश शालिनी यांनी देखील भूमिका केल्या आहेत.

सुहास जोशी यांनी नमूद केले की, नमस्कार फाउंडेशन २००३ मध्ये स्थापित झाली असून, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात मधुमेह व सांधेदुखी मुक्तीसाठी अभियान राबवित आहे.

  • आरोग्य शिबिर: महोत्सवाच्या पाचही दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मधुमेह व सांधेदुखी मुक्त शहर अभियान अंतर्गत आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. येथे डिजिटल पद्धतीने तरंग यंत्राद्वारे नाडी तपासणी, कांस्य थाळी मसाज, ॲक्युप्रेशर, मधुमेह, रक्तदाब तपासणी, उपचार व मार्गदर्शन या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  • सामाजिक कार्य: संस्थेचे सदस्य सलीम शिकलगार यांनी माहिती दिली की, कोविड काळात ५ वर्षांपूर्वी सुरू केलेला मोफत “रोटी बँक” उपक्रम आजही सुरू आहे. दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे रोज दुपारी १२:३० वाजता मोफत जेवण देण्यात येते. तसेच कै. मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दुपारी ४ वाजता मोफत हर्बल टी आणि सायं. ७ वाजता दाखल रुग्णांसाठी मोफत जेवण दिले जाते.

मनोरंजनासाठी फन फेअर (Fun Fair) आणि रोज लकी ड्रॉ विजेत्याला बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 9604992033/9579402954 या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अतुल भोंडवे यांनी यावर्षी आयोजित केलेले सर्व सांस्कृतिक उपक्रम नागरिकांसाठी मोफत असल्याची माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत संयोजन समितीतील सदस्य सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, रमेश कस्तुरे, प्रीतमराणी शिंदे, सीमा हिमने, चंद्रशेखर जोशी, आण्णा हिंगे, मुन्ना बेग, सुनीता खुणे, सचिन सोनवणे, मनोज देशमुख आदी सदस्य उपस्थित होते. यापूर्वी संस्थेच्या कार्यक्रमात पुष्कर श्रोत्री, संजय मोने, मुक्ता बर्वे, संजय नार्वेकर, भूषण कडू, अभिजीत कोसंबी, कार्तिकी गायकवाड, रवींद्र साठे, ज्ञानेश्वर मेश्राम, शरद उपाध्ये, मा. गो. वैद्य, विश्वास मेहंदळे यांनी उपस्थिती लावली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!