news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २५ लाखांच्या ट्रकमधून ११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! २५ लाखांच्या ट्रकमधून ११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

पुणे-मुंबई हायवेवरील ऑर्चिड हॉटेलजवळ गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचा सापळा; बालेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बालेवाडीत गुटख्याची मोठी वाहतूक पकडली! गुन्हे शाखेची कारवाई, ३६ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

 

 

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धडक कामगिरी; पुणे-मुंबई हायवेवर MH-12-RN-3203 क्रमांकाचा ट्रक ताब्यात

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पुणे-मुंबई हायवेवर मोठी कारवाई केली आहे. या पथकाने प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ३६ लाख ४७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक ०२/१२/२०२५ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांची माहिती काढत असताना, श्रेपोउनि महेश खांडे आणि पोलीस हवालदार नितीन लोखडे यांना पुणे-मुंबई हायवेवर MH-12-RN-3203 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने सापळा रचला. पुणे-मुंबई हायवेवरील सर्व्हिस रोड लगत, ऑर्चिड हॉटेलजवळ, बालेवाडी, पुणे येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला.

  • अटक केलेला आरोपी: चौकशी केली असता, ट्रकचालकाने त्याचे नाव नरेश गणेश चौधरी (वय २२ वर्षे, रा. वेलकम होम अप्लायंस, स्पाईन रोड, भोसरी, पुणे) असे सांगितले.

  • जप्त केलेला मुद्देमाल: दोन पंचांसमक्ष ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, शासनाने प्रतिबंधित केलेला ११,४७,९००/- रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. यासोबतच २५,००,०००/- रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रकही जप्त करण्यात आला.

  • एकूण हस्तगत मुद्देमाल: ३६,४७,९००/- रुपये.

आरोपी नरेश गणेश चौधरी याच्याविरुद्ध बालेवाडी पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. ५९०/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम १२३, २७१, २७२, २७४, २७५, २२३ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम ३०(२) (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., सह पोलीस आयुक्त मा. श्री. शशिकांत महावरकर सो., अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड सो., पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाई करणाऱ्या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, श्रेपोउनि महेश खांडे, आणि पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, पवन वाजे, सुमित देवकर, समीर रासकर, अमर कदमज्ञानेश्वर कौलगे यांचा समावेश होता.


 

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!