news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड ‘दादा-देवेंद्र’ मैत्रीची शहरात चर्चा; वैशालीताई काळभोर यांच्या अर्जावर भाजपची काय असेल भूमिका? ६ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष

‘दादा-देवेंद्र’ मैत्रीची शहरात चर्चा; वैशालीताई काळभोर यांच्या अर्जावर भाजपची काय असेल भूमिका? ६ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष

अजितदादांच्या निधनानंतर अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी दाखल; महायुतीचा धर्म पाळत 'सन्मान' मिळण्याची राजकीय वर्तुळात दाट शक्यता. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून वैशालीताई काळभोर यांचा अर्ज; मुख्यमंत्री फडणवीस मैत्रीखातर ‘दादां’च्या पक्षाला पद बहाल करणार?


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नगरसेविका वैशालीताई काळभोर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, हे पद राष्ट्रवादीला बहाल केले जाण्याची दाट शक्यता स्थानिक राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सध्या पक्षात शोकाकुळ वातावरण आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जल्लोष किंवा गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा अर्ज भरण्यात आला. महानगरपालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी वैशालीताई काळभोर यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे, प्रमोद कुटे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वि विशाल काळभोर उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरताना शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले होते. यावर विचारले असता वैशालीताई काळभोर यांनी स्पष्ट केले की, “शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखालीच आम्ही ही उमेदवारी दाखल केली आहे. ते सध्या मुंबई दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.”

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. ‘दादां’च्या निधनानंतर त्यांच्या पक्षाला सन्मान देण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी महायुतीचा धर्म पाळत उपमहापौर पद राष्ट्रवादीला दिले जाऊ शकते, अशी चर्चा शहरातील सामान्य नागरिकांमध्ये आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

येत्या ६ फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सभेत या पदाबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!