news
MAHATET २०२६ चा बिगुल वाजला! २१ जूनला राज्यभरात रंगणार परीक्षा; पात्रता धारकांनी २७ मार्चपासून भरावेत अर्जअमरावती विभागात ३,५४७ अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित! जिल्हा दक्षता समितीने दरमहा आढावा घेण्याच्या सूचनाअमरावतीच्या ३८ गुणवंतांना ‘TCS’ मध्ये नियुक्तीची पत्रे! ‘पंडित दीनदयाल उपाध्याय मेळाव्या’त तरुणांच्या स्वप्नांना मिळाली भरारीभामा आसखेड प्रकल्पातून शहराला मिळणार १६७ दशलक्ष लिटर जादा पाणी! महापालिका प्रशासनाकडून कामाला वेगपिंपरी-चिंचवड आरपीआयमध्ये खांदेपालट! विलास कांबळे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा; पँथर कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा मैदानात
Home पिंपरी चिंचवड फिनिक्स भरारी! शरद पवारांचा ‘तिसरा डोळा’ उघडला; कुटुंबातील युवा नेतृत्वाला सक्रिय करून विरोधकांना दिले मोठे आव्हान

फिनिक्स भरारी! शरद पवारांचा ‘तिसरा डोळा’ उघडला; कुटुंबातील युवा नेतृत्वाला सक्रिय करून विरोधकांना दिले मोठे आव्हान

सोशल मीडियावरील 'त्या' फ्रेम्सनी उडवली खळबळ; वस्तादाचा डाव पाहून टीकाकारांचे धाबे दणाणले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'पवार पॅटर्न'चा बोलबाला. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पवार इज ‘पॉवर’! वस्तादांनी तिसऱ्या पिढीचे शिलेदार मैदानात उतरवले; ‘अल्टिमेट पॉवर सेंटर’च्या नव्या डावाने विरोधकांची झोप उडाली


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’ मानले जाणारे शरद पवार साहेब यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवले आहे. “पवार इज पॉवर” (Pawar is Power) हे पुन्हा एकदा सिद्ध करत साहेबांनी आता तिसऱ्या पिढीतील शिलेदारांना मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. साहेबांच्या या नव्या खेळीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांची, विशेषतः त्यांच्या विरोधकांची झोप उडाली असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

राजकारणात जेव्हा जेव्हा शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेव्हा ते अधिक ताकदीने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावले आहेत. आता साहेबांनी आपल्या कुटुंबातील आणि पक्षातील तिसऱ्या पिढीला सक्रिय राजकारणाच्या मैदानात उतरवले आहे. ही केवळ नवी पिढी नसून साहेबांनी तयार केलेले ‘शिलेदार’ आहेत, जे भविष्यातील राजकारणाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सोशल मीडियावर सध्या साहेबांच्या तिसऱ्या पिढीसोबतच्या फ्रेम्स व्हायरल होत आहेत. या फ्रेम्स बघून अनेकांनी ‘साहेबांचा हा मास्टरस्ट्रोक’ असल्याचे म्हटले आहे. साहेबांनी टाकलेला हा डाव पाहून त्यांच्यावर टीका करणाऱ्या ‘चांडाळ चौकडी’चे आणि राजकीय विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. साहेब जेव्हा शांत असतात, तेव्हा ते मोठा डाव टाकत असतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा येत आहे.

८५ व्या वर्षीही शरद पवार ज्या ऊर्जेने आणि जिद्दीने काम करत आहेत, ते पाहून तरुणांनाही लाज वाटेल. तिसऱ्या पिढीला सोबत घेऊन मैदानात उतरलेले साहेब हे आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘अल्टिमेट पॉवर सेंटर’ आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे. डाव कितीही कठीण असला, तरी तो उलटवण्याची ताकद केवळ साहेबांकडेच आहे, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!