news
साठेबाजी केल्यास कारवाई! पेट्रोल पंप चालकांना जिल्हा प्रशासनाचा इशारा; आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधनाला ‘अत्यावश्यक वस्तू’ म्हणून दर्जामुलांनी आईला ‘म्हातारपणाची काठी’ नव्हे, तर ‘समान व्यक्ती’ मानावे! लैंगिक शिक्षणातून विज्ञानवादी समाजाची पायाभरणी; कालबाह्य रूढींना तिलांजली देण्याची वेळतांत्रिक कौशल्याचा ‘स्मार्ट’ वापर! सांगवी पोलिसांनी ‘IMEI’ ट्रेस करून शोधले हरवलेले फोन; सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते वाटपआकर्षक पगार अन् सुरक्षित भविष्य! आयडीबीआय बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी भरतीचा बिगुल; १९ मार्चपर्यंतच करता येणार ऑनलाइन अर्जहॉटेल उद्योगाला मोठा दिलासा! व्यावसायिक गॅस बंदीच्या पत्राने उडालेली खळबळ शमली; घरगुती गॅस साठा वाढवण्यासाठी होता मंत्रालयाचा निर्णय
Home कोल्हापूर मुलांनी आईला ‘म्हातारपणाची काठी’ नव्हे, तर ‘समान व्यक्ती’ मानावे! लैंगिक शिक्षणातून विज्ञानवादी समाजाची पायाभरणी; कालबाह्य रूढींना तिलांजली देण्याची वेळ

मुलांनी आईला ‘म्हातारपणाची काठी’ नव्हे, तर ‘समान व्यक्ती’ मानावे! लैंगिक शिक्षणातून विज्ञानवादी समाजाची पायाभरणी; कालबाह्य रूढींना तिलांजली देण्याची वेळ

केवळ उत्सव नको, तर आत्मपरीक्षण करा! कोल्हापूर माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांचे परखड मत; स्त्री-पुरुष समानतेसाठी मुलांच्या संस्कारांत बदलाचे आवाहन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महिला दिन विशेष: आईने मुलाला ‘समानतेची दीक्षा’ देण्याचा दिवस! घरकापासुन ते आर्थिक निर्णयापर्यंत मुलांमध्ये रुजवा समतेचे संस्कार


कोल्हापूर/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

कोल्हापूर/पिंपरी : “जागतिक महिला दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता साधायची असेल, तर आजच्या मातांनी आपल्या मुलींना नव्हे, तर मुलांना लिंग समानतेचा संदेश देण्याची खरी गरज आहे,” असे परखड मत विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूरचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले आहे.

८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी समाजातील पितृसत्ताक मानसिकतेवर प्रहार करत घरातील संस्कारांमध्ये बदलाचे आवाहन केले आहे.

लेखात टाके यांनी नमूद केले की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” असे म्हणणारी पिढी आजही स्वतःचे ताट किंवा स्वतःचे कपडे आईला धुवायला लावण्यात धन्यता मानते. जोपर्यंत मुलगा आणि मुलगी यांच्यात घरकाम, बालसंगोपन आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेत समान सहभागाची सवय लावली जात नाही, तोपर्यंत लिंगभेद नष्ट होणार नाही. मुलांनी आईला ‘म्हातारपणाची काठी’ मानण्यापेक्षा ‘समान व्यक्ती’ म्हणून तिचा आदर करणे आवश्यक आहे.

वयात येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्यावर घराघरात वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा व्हायला हवी. लैंगिक शिक्षण हा संस्कृतीवर घातलेला घाला नसून ती एका विज्ञानवादी समाजाची पायाभरणी आहे. मुलांना लहानपणीच ‘गुड टच – बॅड टच’ ची माहिती दिल्यास कौटुंबिक आणि नात्यांमधील लैंगिक शोषणाला पायबंद बसू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नैसर्गिक शारीरिक क्रियांना ‘अशुद्ध’ मानण्याच्या कालबाह्य समजुतींना आता तिलांजली देण्याची वेळ आली आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळे ठेवणे किंवा धार्मिक विधींपासून दूर ठेवणे या रूढींचा पुनर्विचार करणे हीच खरी संस्कृतीची प्रगती आहे. जो समाज या अघोरी रूढी पाळतो, त्याला ‘सुसंस्कृत’ म्हणायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

स्वीडन, नॉर्वे आणि आइसलँड सारख्या देशांनी पालकत्व रजा आणि समान वेतनाचे कायदे करून समानता साध्य केली आहे. भारतीय संविधानानेही कलम १४ व १५ अन्वये लिंगभेद अमान्य केला आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी मुलांच्या मनात आदर आणि संवेदनशीलतेची बीजे पेरणे ही प्रत्येक आईची आणि पित्याची जबाबदारी आहे.

  • मुलांना घरकामात पारंगत करा: स्वतःची कामे स्वतः करण्याची शिस्त लावा.

  • आर्थिक साक्षरता: मुलींना मालमत्ता आणि व्यवहाराचे ज्ञान द्या.

  • तृतीय पंथीयांचा सन्मान: तृतीय पंथीयांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याची जाणीव मुलांना करून द्या.

  • सुरक्षितता: संस्कार असे हवेत की मध्यरात्री मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच सुरक्षित असतील.

जागतिक महिला दिनाच्या सार्थतेसाठी केवळ घोषणा न देता, आपल्या वागण्यातून समतेचा संदेश देऊया, असे आवाहन प्रवीण टाके यांनी केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!