news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home अमरावती गोडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून तपासणी अन् मोफत औषधोपचार! नवसारी परिसरात आरोग्याचा जागर; ‘गप्पी मासे पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा’चा संदेश

गोडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून तपासणी अन् मोफत औषधोपचार! नवसारी परिसरात आरोग्याचा जागर; ‘गप्पी मासे पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा’चा संदेश

माता, बालके आणि ज्येष्ठांसाठी भव्य आरोग्य शिबिर; महापालिका आयुक्त सौम्या चांडक - शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांनी घेतला लाभ. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती महापालिकेचा स्तुत्य उपक्रम! नवसारी आरोग्य वर्धनी केंद्रात शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी; तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूकडून रोगनिदान


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नवसारी आरोग्य वर्धनी केंद्र (RCH) अंतर्गत माता, बालके, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौम्या चांडक – शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग चे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे ,डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ.आकिब खान यांनी पार पडलेल्या या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

गोडे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने या शिबिरात आपली सेवा दिली. यामध्ये प्रामुख्याने खालील तपासण्या करण्यात आल्या:

  • तपासणीचे स्वरूप: रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी, कर्करोग निदान आणि त्वचा रोग तपासणी.

  • गर्भवती महिला: गरोदर मातांची विशेष आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन.

  • बालरोग: लहान मुलांच्या आजारांचे निदान करून त्यांना औषधोपचार देण्यात आले.

यावेळी डॉ. अंकिता राऊत, डॉ. आकाश (नेत्र विभाग), डॉ. समीर चाऊस (बालरोगतज्ञ), डॉ. विनंती नवरे (कुष्ठरोग अधिकारी) , डॉ. श्वेता मोहोड (त्वचारोग तज्ञ) आणि जोसेफ पीटर व पन्हाळे (आरोग्य तपासणी साहाय्यक) यांनी रुग्णांची तपासणी केली.

साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांनी यावेळी कीटकजन्य आणि जलजन्य आजारांबाबत नागरिकांना सतर्क केले. पावसाळी वातावरणात किंवा साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या. तर महेंद्र कॉलनी नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकिब खान यांनी नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले.

आरोग्य निरीक्षक हैदर अली आणि शशिकांत जैस्वाल यांनी जनजागृती करताना “गप्पी मासे पाळा, डेंग्यू-मलेरिया टाळा” असा संदेश दिला. तापाची लक्षणे आढळल्यास रक्ताची तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात आरोग्य सेविका वैशाली सुरोशे, अर्चना बाळस्कर, पुरुष आरोग्य सेवक मनीष हटवार, उमेश जाधव, जुबेर खान आणि सर्व आशा स्वयंसेविकांनी मोलाचे सहकार्य केले.

महेंद्र कॉलनी आणि नवसारी परिसरात या शिबिरामुळे समाधानाचे वातावरण असून, नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले आहे. औषध निर्माण अधिकारी राहुल खलेलकर आणि लॅब टेक्निशियन मीनाक्षी पाटेकर यांनी औषध वाटप आणि रक्त तपासणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!