news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड ६५० हून अधिक संशोधकांनी मांडले आपले प्रबंध! पीसीईटीच्या पीसीसीओईआरमध्ये विज्ञानाचा जागर; डॉ. पारिक्षित महाले अन् डॉ. मनीष शर्मा यांच्याकडून संशोधनाचे धडे

६५० हून अधिक संशोधकांनी मांडले आपले प्रबंध! पीसीईटीच्या पीसीसीओईआरमध्ये विज्ञानाचा जागर; डॉ. पारिक्षित महाले अन् डॉ. मनीष शर्मा यांच्याकडून संशोधनाचे धडे

दर्जेदार संशोधनासाठी रावेतच्या पीसीसीओईआरचा पुढाकार; "प्रभावी संशोधन लेखन" विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषद संपन्न, देश-विदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पीसीसीओईआर कटिबद्ध! आंतरराष्ट्रीय परिषदेत ६५० संशोधकांचा ऑनलाईन सहभाग; डॉ. हरीश तिवारी यांनी मांडले विचार


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत : “संशोधन संस्कृती केवळ वाढवणे नव्हे तर ती दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी पीसीसीओईआरचा संशोधन व विकास विभाग सातत्याने कार्यरत आहे,” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (PCCOER) मध्ये “प्रभावी संशोधन लेखन: तत्त्वे आणि सराव” या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेला देश-विदेशातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, ६५० हून अधिक संशोधकांनी ऑनलाइन पद्धतीने आपले संशोधन प्रबंध सादर केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने आयोजित या परिषदेत विविध तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले:

  • डॉ. पारिक्षित महाले (VIT, पुणे): यांनी संशोधनाची मूलभूत तत्त्वे आणि ओळख करून दिली.

  • डॉ. मनीष शर्मा (DYPCOE, पुणे): यांनी पद्धतशीर ‘साहित्य सर्वेक्षण’ कसे करावे, यावर प्रकाश टाकला.

  • डॉ. समीर गजघाटे (GHRCEM, पुणे): यांनी संशोधन प्रस्तावाचे नियोजन व लेखनातील महत्त्वाचे टप्पे मांडले.

  • डॉ. सूर्य प्रकाश (इलाहाबाद): यांनी संशोधनाचा जागतिक प्रभाव (Impact) कसा वाढवावा, याचे तंत्र सांगितले.

  • डॉ. उमेश भाडाडे (SLRTCE, मुंबई): यांनी निष्कर्ष लेखनाची प्रभावी पद्धत आणि परिणामांची मांडणी कशी करावी, हे समजावून सांगितले.

या परिषदेचे यशस्वी संयोजन डॉ. सुदर्शन बोबडे आणि डॉ. राहुल बावणे यांनी केले. समन्वयक म्हणून डॉ. किशोर भांगलेडॉ. शिवांगा गव्हाणे यांनी जबाबदारी सांभाळली. उपसंचालक डॉ. राहुल मापारी व कुलसचिव प्रकाश येवले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या यशस्वी उपक्रमाबद्दल पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्राचार्य डॉ. हरीश तिवारी व सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!