आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये सामाजिक उपक्रम; १२५ गरजूंना गृहपयोगी वस्तूंचे वाटप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाकड: चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील गरजूंसाठी ‘अभिष्टचिंतन सोहळा’ सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २५ मधील नगरसेवक श्री. कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने आणि कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सुमारे १२५ गरजू कुटुंबांना गृहपयोगी वस्तू, अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संच प्रदान करण्यात आले. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त फालतू खर्च टाळून थेट कष्टकरी वर्गाला मदत पोहचवण्याच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल (दादा) कलाटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, रिपाईच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे, नगरसेविका स्नेहाताई कलाटे, रेश्माताई भुजबळ, आरतीताई चोंधे उपस्थित होते.
तसेच सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, विनोद चांदमारे, विलास पाटील, विशाल वाव्हळकर, आशिष थोरात, संतोष डेंगळे, सूरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक राहुल दादा कलाटे यांनी कुणाल वाव्हळकर यांच्या कामाची प्रशंसा करताना सांगितले की, “नगरसेवक झाल्यानंतरही कुणाल वाव्हळकर यांची नाळ सर्वसामान्यांशी जोडलेली आहे. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच सर्वात मोठे पद असते. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त असा समाजोपयोगी कार्यक्रम राबवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.”
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी कुणाल वाव्हळकर यांच्या निष्ठेचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक करत आमदार शंकरभाऊ जगताप यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



