news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home अकोला स्थापना दिनानिमित्त मूर्तीजापुरात भाजपचा शक्तिप्रदर्शन! आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

स्थापना दिनानिमित्त मूर्तीजापुरात भाजपचा शक्तिप्रदर्शन! आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

राम जोशी यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करून जल्लोष; नगराध्यक्ष हर्षलजी साबळे यांच्या नेतृत्वात भरगच्च उपक्रम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मूर्तीजापुरात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; आमदार हरीश पिंपळेंच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांचा जल्लोष

 

 

 

अकोला/मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, दिनांक: ६ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तीजापूर: भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. स्थानिक आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष हर्षलजी साबळे यांच्या नेतृत्वात शहरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्थापना दिनानिमित्त लकडगंज येथील आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्रित येऊन पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि ध्येयधोरणांचा जागर करत स्थापना दिन साजरा केला.

यावर्षीच्या स्थापना दिनाचे खास आकर्षण म्हणजे ‘घरोघरी झेंडे’ मोहीम. शहराच्या विविध भागांत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या घरांवर जाऊन भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले. या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण मूर्तीजापूर शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते.

या मोहिमेचा एक भाग म्हणून राम जोशी यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी राम जोशी यांनी आपल्या सहपरिवारासह घराच्या छतावर पक्षाचा ध्वज फडकविला. या क्षणी उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!