news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड लेखापरीक्षकांसाठी मोठी संधी! २०२६-२८ कालावधीसाठी राज्यस्तरीय पॅनेलची निवड प्रक्रिया सुरू

लेखापरीक्षकांसाठी मोठी संधी! २०२६-२८ कालावधीसाठी राज्यस्तरीय पॅनेलची निवड प्रक्रिया सुरू

महासहकार पोर्टलवर ऑनलाइन अर्जांची सुविधा; सहकार विभागाकडून पात्र व्यावसायिकांना मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक नामतालिकेसाठी अर्ज आमंत्रित; २० एप्रिल ही अंतिम मुदत

पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी आकाश कांबळे, १६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विविध कलमांतील तरतुदींनुसार, सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन २०२६-२०२८ या कालावधीकरिता राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका (Panel) तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून २० एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, इच्छुक लेखापरीक्षकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

इच्छुक उमेदवारांना महासहकारच्या अधिकृत पोर्टलवर mahasahakar.maharashtra.gov.in अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (१) (ब) आणि १९६१ च्या नियम ६९ (१) (फ) मधील तरतुदींनुसार ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

  • संकेतस्थळ: सहकार विभाग, सहकार आयुक्त आणि सहकार निबंधक यांच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

  • कार्यालयीन संपर्क: अधिक माहितीसाठी सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयात परिपत्रकीय सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सहकारी संस्थांच्या पारदर्शक कामकाजासाठी अनुभवी आणि पात्र लेखापरीक्षकांची ही नामतालिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पात्र व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!