news
जागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले
Home मुख्यपृष्ठराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना मिळणारे अर्थसहाय्य थांबले

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना मिळणारे अर्थसहाय्य थांबले

नागपूर(मॅक्स मंथन डेली न्यूज): केंद्र सरकारने जातीय भेदभाव कमी करण्यासाठी सुरू केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद केली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जात होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने २०१४-१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. मात्र, कोणतीही स्पष्टexit कारण न देता ही योजना आता बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यांना थेट योजना बंद झाल्याचे पत्र समाज कल्याण विभागाकडून पाठवले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीतील असणे आवश्यक होते. तसेच, विवाहाच्या एका वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दिसते. परंतु, पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवून योजना बंद झाल्याचे कळवले आहे. सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

आंतरजातीय विवाहांचे अल्प प्रमाण

जात आणि धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्यांचे प्रमाण आजही भारतात खूप कमी आहे. अनेक संस्थांच्या अहवालानुसार, हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!