news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता!

साखरेच्या दुहेरी भावामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ शक्य!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ऊस उत्पादकांसाठी खुशखबर! प्रति टन ४९५०.८ भाव शक्य! – सतीश देशमुख (मॅक्स मंथन डेली न्यूज, पुणे)

साखरेला दुहेरी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांसह कारखाने आणि सरकारलाही फायदा!

पुणे: “जर साखरेला औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी असे दोन प्रकारचे भाव निश्चित केले, तर शेतकऱ्यांना उसाला प्रति टन ₹४९५०.८ भाव मिळू शकतो. आजच्या परिस्थितीत तर हा भाव याहूनही अधिक मिळू शकेल,” असा विश्वास फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ च्या त्यांच्या कॅलक्युलेशन्स आणि सूत्राचा हवाला देत हे मत मांडले. देशमुख म्हणाले की, साखरेला दुहेरी भाव देण्याची मागणी मान्य झाल्यास शेतकरी, साखर कारखाने आणि सरकार या सर्वांनाच फायदा होईल.

या मागणीमुळे होणारे फायदे:

  • शेतकऱ्यांना मिळणारा भाव: ₹४९५०.८ प्रति टन
  • एका साखर कारखान्याला होणारा फायदा: ₹२६२.२ कोटी
  • सरकारला मिळणाऱ्या महसुलातील वाढ: ₹२६,२७२ कोटी प्रति वर्ष

सतीश देशमुख यांनी साखर कारखान्यांना शत्रू मानण्याऐवजी शीतपेये, कॅडबरी, मिठाई, मद्य आणि औषधे यांसारख्या इतर उद्योगांकडे लक्ष वेधले आहे, जे साखरेवर प्रक्रिया करून ४०० टक्क्यांहून अधिक नफा कमावतात. त्यांनी असेही नमूद केले की, एका कुटुंबाला महिन्याला साधारणतः तीन किलो साखर लागते. त्यामुळे साखरेच्या भावात २७ रुपये प्रति महिना वाढ झाली तरी सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघराच्या अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही.

या मागणीची अंमलबजावणी कशी करता येईल, याची तपशीलवार मांडणी लवकरच दुसऱ्या लेखात केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय राज्य सहकार मंत्री श्री. मुरलीधर मोहळ यांची भेट घेणार आहे.

सतीश देशमुख यांनी सर्व शेतकरी, कार्यकर्ते, संघटना, साखर कारखाने आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भातील त्यांच्या बैठकीची ‘अ‍ॅग्रोवन’मधील बातमी आणि कॅलक्युलेशन्स सोबत जोडले आहेत.

सतीश देशमुख, B.E. (Mech.) अध्यक्ष, फोरम ऑफ इंटेलेक्चुअल्स एकच ध्यास – शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!