news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी!

दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी!

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू; गरजूंना मिळणार वैद्यकीय मदत!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुणे (मॅक्स मंथन डेली न्यूज): आता गरजूंना दुर्धर आजारांवर उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदत मिळवणं अधिक सोपं झालं आहे! पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी जुन्या जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर, खोली क्रमांक १० मध्ये एक विशेष कक्ष सुरू केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून ‘आयुष्यमान भारत’ सह विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र दिनापासून राज्यभरात जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे आता कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करणे आणि मदत मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या या कक्षात एक पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक आणि समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात शासनाच्या सर्व आरोग्य सुविधा आणि योजनांच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळू शकेल.

‘आयुष्यमान भारत’ सह सर्व शासकीय योजना एकाच ठिकाणी:

या कक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’, राज्य सरकारची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि पुणे महानगरपालिकेची ‘शहरी-गरीब योजना’ यांसारख्या अनेक वैद्यकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या आजारांसाठी मिळू शकते आर्थिक मदत:

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे गरजू रुग्णांना हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थीमज्जा आणि गुडघे, हात व खुब्याच्या प्रत्यारोपणासारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळू शकते. यासोबतच कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, औषधोपचार, अस्थिबंधन, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदय रोग, डायलिसिस, जळीत रुग्ण आणि रस्ते अपघातातील रुग्णांनाही या निधीतून मदत मिळू शकते.

अधिक माहितीसाठी १८००१२३२२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्जदार त्यांचे अर्ज aao.cmrf-mh@gov.in या ईमेल आयडीवर पाठवू शकतात.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग केलेला फोटो
  • निदान व उपचारासाठी अपेक्षित खर्चाचे अंदाजपत्रक
  • तहसीलदार कार्यालयाने प्रमाणित केलेले चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी उत्पन्न)
  • रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, लहान बालकाच्या मातेचे आधार कार्ड
  • आजार व उपचारासंबंधी कागदपत्रे
  • अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट
  • अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी विभागीय समितीचे मंजुरी पत्र
  • अर्थसाह्याच्या मागणीचा मूळ अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पीडीएफ कॉपी aao.cmrf-mh@gov.in या ईमेलवर पाठवावी.

आता पुणे जिल्ह्यातील गरजू नागरिक या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या प्रियजनांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देऊ शकतात.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!